कुठे – कल्याण-ठाणे अप जलद मार्ग
कधी – सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०
परिणाम – मेगाब्लॉकमुळे सकाळी १०.२२ पासून ते दुपारी ४ वाजेपर्यंतच्या काळात कल्याणवरून सुटणाऱ्या सर्व अप मार्गावरील जलद गाडय़ा कल्याण ते ठाणे दरम्यान धीम्या अप मार्गावरून चालवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, दादर आणि भायखळा या स्थानकांवर थांबविण्यात येतील. तर डाऊन मार्गावरही सकाळी १०.०८ पासून ते दुपारी २ वाजून ४२ मिनिटांपर्यंतच्या सर्व जलद गाडय़ा  विक्रोळी, भांडूप आणि मुलुंड स्थानकावर थांबवण्यात येणार आहेत.
मेगाब्लॉकमुळे रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडीचा (गाडी क्रमांक ५०१०४)प्रवास दिवा स्थानकावरच समाप्त करण्यात येणार असून नेहमी दादरवरून सुटणारी रत्नागिरी पॅसेंजर (गाडी क्रमांक ५०१०३) दिवा स्थानकातून सोडण्यात येईल.

कुठे -छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला डाऊन मार्ग आणि वडाळा ते वांद्रे अप-डाऊन मार्ग
कधी- सकाळी ११.१० ते दुपारी ३.१०
परिणाम – सीएसटी ते पनवेल, वाशी आणि बेलापूरच्या सर्व गाडय़ा सीएसटी ते कुर्ला दरम्यान ‘मेन’ रेल्वेमार्गावरून चालवण्यात येतील. मात्र, या गाडय़ा चिंचपोकळी आणि करीरोड स्थानकावर थांबणार नाहीत. तर मेगाब्लॉकमुळे सीएसटी ते अंधेरी-वांद्रे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. या मार्गावरील प्रवाशांना सीएसटीहून पश्चिम रेल्वेने किंवा मध्य रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.