पावसामुळे प्रवाशांचा खोळंबा करणारी लोकल आता पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. ठाणे-कळवा मार्गावर धावणाऱ्या लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्यरेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.  ठाणे-कळवा दरम्यान धावणारी  लोकल तांत्रिक बिघाडामुळे अर्धातासाहून अधिककाळ मार्गावर अडकून आहे. परिणामी, कल्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतूक कोलमडली आहे.  लोकलच्या तांत्रिक बिघाडामुळे कल्याणच्या दिशेन जाणारी वाहतूक खोळंबल्याचा परिणामी मध्यमार्गावरील वाहतूक कोलमडली आहे.  मध्यरेल्वे विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. स्थानकावरील गर्दीमध्ये वाढ होत आहे. या मार्गावरील वाहतूक लवकरात लवकर सुरु करण्याचा प्रयत्न रेल्वेप्रशासन करीत आहे. मात्र, यासाठी किती वेळ लागेल हे अद्याप सांगता येत नाही.