वांद्रय़ाच्या खाडीपुलावरून गाडी पुढे जाते.. थंड झुळूक आल्यानंतर थकलाभागला मुंबईकर जरा डोळे मिटतो तोच, ‘स्वाद सुगंध का राजा..’ अशी कर्कश धून कानावर पडते आणि मुंबईकर प्रवाशांचा शिणवटा आणखी वाढतो. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना येणारा हा सार्वत्रिक अनुभव मध्य रेल्वेकरांसाठी टळणार आहे. मध्य रेल्वेवरील उद्घोषणेचे सॉफ्टवेअर हे दुसऱ्याच कंपनीच्या हाती असल्याने मध्य रेल्वेवर उत्पन्नवाढीसाठी जाहिरातींची टिमकी वाजवता येणार नसल्याने प्रवाशांची सुटका झाली आहे.

२००६-०७ पासून एमयूटीपी-१ योजनेअंतर्गत मुंबईकरांच्या सेवेत आलेल्या सिमेन्स कंपनीच्या गाडय़ांमध्ये प्रवासी उद्घोषणा प्रणाली आहे. या प्रणालीचा वापर प्रवाशांना बिघाडाबाबतच्या सूचना देण्यासाठी एकदाही झाला नसला, तरी त्याद्वारे प्रवाशांना त्यांच्या सुरक्षेबाबत अनेक सूचना दिल्या जातात.

uran potholes marathi news
उरण: खोपटे-कोप्रोली मार्गावर खड्ड्यांचे विघ्न कायम, एकाच ठिकाणी खड्डे कसे? प्रवाशांचा सवाल; कोट्यवधी रुपये खर्च करूनही दुरवस्था
Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Planning of extra bus service by state transport due to holidays
नाशिक : सुट्यांमुळे राज्य परिवहनतर्फे जादा बससेवेचे नियोजन
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?

पश्चिम रेल्वेने या प्रणालीचा वापर उत्पन्नवाढीसाठी करण्याचा निर्णय घेत या प्रणालीद्वारे जाहिरातींचे प्रसारण सुरू केले. त्यामुळे सध्या पश्चिम रेल्वेवर विविध उत्पादनांच्या श्राव्य माध्यमातील जाहिराती प्रवाशांच्या कानांवर पडतात.

मध्य रेल्वेवर अशा जाहिराती सुरू झाल्यानंतर अनेक प्रवाशांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असली, तरी अत्यल्प तिकीट दरांत रेल्वे प्रवासी वाहतूक करत असल्याने जाहिरातींमधून उत्पन्न मिळवण्याचा हा उत्तम पर्याय असल्याचे रेल्वेकडून वारंवार स्पष्ट करण्यात येते.

मध्य रेल्वेच्या गाडय़ांमध्ये प्रत्येक स्थानक येण्याआधी तीन भाषांमध्ये त्या स्थानकाच्या नावाची उद्घोषणा दोन वेळा केली जाते. तसेच ‘कृपया गाडीचे पायदान व फलाट..’ ही सूचनाही प्रवाशांच्या कानांवर सातत्याने पडते. गाडी सुटण्याआधी प्रवाशांसाठी विविध सूचना केल्या जातात. त्यातच या जाहिरातींची भर पडल्यास प्रवाशांच्या नाराजीलाही सामोरे जावे लागणार असल्याने मध्य रेल्वेने ही जाहिरातबाजी टाळल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

फक्त सूचना ऐकू येणार

पश्चिम रेल्वेवर विविध उत्पादनांच्या श्राव्य माध्यमातील जाहिराती प्रवाशांच्या कानांवर पडतात. मध्य रेल्वेवरही अशा प्रकारे जाहिरातबाजी करण्यासाठी अनेक उत्पादक उत्सुक होते. मात्र मध्य रेल्वेवरील या उद्घोषणा प्रणालीचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर तिसऱ्या कंपनीमार्फत चालवले जाते. त्यामुळे प्रवासी सुरक्षाविषयक सूचना वगळता अन्य व्यावसायिक जाहिराती वाजवणे शक्य नसल्याचे मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.