News Flash

वेतनासाठी मध्य रेल्वेतील उद्घोषकांचे काम बंद आंदोलन

बुधवारपासून उद्घोषकांनी काम बंद आंदोलन के ले.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात गुरुवारी रेल्वे उद्घोषकांनी धरणे आंदोलन केले.

मुंबई: गेल्या तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने आर्थिक परिस्थिती हलाखीची झाल्याने बुधवारी रात्रीपासून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील २०० कं त्राटी उद्घोषकांनी काम बंद आंदोलन सुरू के ले, त्यामुळे उद्घोषणा ठप्पच झाली. तर सीएसएमटी स्थानकात गुरुवारी धरणे आंदोलन के ल्याने एकच गोंधळ उडाला. कंत्राटदाराला वेतनाचे बिल रेल्वेकडे जमा करण्याचे आदेश दिल्यानंतर वेतन लवकरच मिळेल, या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

रेल्वे स्थानकातील उद्घोषणांसाठी पूर्वी रेल्वेच्या विविध विभागातूनच उद्घोषकांची निवड होत होती. यामध्ये बढती किं वा वेतन वाढीचीही शक्यता नसल्याने रेल्वे कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे उद्घोषकांची कमतरता जाणवू लागल्याने मध्य रेल्वेने २०१६ पासून कं त्राटी पद्धतीने त्यांची भरती करण्यास सुरुवात केली. यासाठी एका कं पनीला कंत्राटही दिले. उद्घोषकांची कंत्राटी पद्धतीने दोन वर्षांकरिता भरती के ली जाऊ लागली. सध्या २०० उद्घोषक काम करतात. त्यांना गेल्या तीन महिन्यांपासूनचे वेतनच देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक चणचण भासू लागली. बुधवारपासून उद्घोषकांनी काम बंद आंदोलन के ले. यासंदर्भात कंत्राटदाराशी रेल्वे प्रशासनाने चर्चा के ली असून त्याला वेतनाची बिले सादर करण्यास सांगितले असल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी स्पष्ट केले. लवकरच त्यांचे वेतन दिले जाईल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, आर्थिक विवंचनेला कंटाळून उल्हासनगरमधील व्यंकटेश वेणुगंटी नावाच्या उद्घोषकाने बुधवारी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली.

या घटनेमुळे रेल्वेतील सर्व कंत्राटी उद्घोषकांनी काम बंद आंदोलन करतानाच गुरुवारी सीएसएमटी स्थानकात धरणे आंदोलनही केले. व्यंकटेश यांच्यावर उल्हासनगरमधील मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2021 1:41 am

Web Title: central railway announcers protest for wages in mumbai zws 70
Next Stories
1 सासू-सासऱ्यांनी टोमणे मारणे हा वैवाहिक जीवनाचा भाग
2 मनुष्यवस्तीत सापडणारे साप राणीच्या बागेत ठेवण्यास पालिकेचा नकार
3 वर्षअखेरीची डोंगर भटकं ती थंडावली
Just Now!
X