News Flash

‘मरे’ रुळांवर येईना!

मध्य रेल्वेमार्गावर मंगळवारी ओव्हरहेड वायर तुटल्याने झालेला गोंधळ ताजा असताना बुधवारी सकाळीही लोकलसेवेची सुरुवात गोंधळानेच झाली.

| September 4, 2014 03:12 am

मध्य रेल्वेमार्गावर मंगळवारी ओव्हरहेड वायर तुटल्याने झालेला गोंधळ ताजा असताना बुधवारी सकाळीही लोकलसेवेची सुरुवात गोंधळानेच झाली. सकाळी दहाच्या सुमारास दिवा आणि मुंब्रा या स्थानकांदरम्यान रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेवरील वाहतूक उशिराने धावत होती. याच दरम्यान वाशी आणि मानखुर्ददरम्यानही रुळाला तडा गेल्याने हार्बर मार्गावरील वाहतूकही खोळंबली.
मध्य रेल्वेवर सकाळी १०.२०च्या दरम्यान अप धीम्या मार्गावर दिवा आणि मुंब्रा या स्थानकांदरम्यान रुळाला तडा गेला. या बिघाडामुळे कल्याणहून मुंबईकडे येणारी गाडी खोळंबली. सकाळच्या वेळेत झालेल्या या घटनेमुळे गाडय़ा २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत होत्या. दुपापर्यंत वाहतूक पूर्ववत झाली नव्हती. तर हार्बर मार्गावर ९.२० वाजता वाशी आणि मानखुर्द या स्थानकांदरम्यान रुळाला तडा गेल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला. मुंबईकडे येणाऱ्या रुळावर तडा गेल्याने कामावर येणारे लोक खोळंबले. मात्र हा बिघाड दहा मिनिटांत दुरुस्त करण्यात आल्याने प्रवाशांचे जास्त हाल झाले नाहीत.
सहा दिवस बिघाडाचे
*११ ऑगस्ट – मध्य रेल्वेवर आटगाव-आसनगावदरम्यान लोकलच्या डब्यात तांत्रिक बिघाड. हार्बरवर मस्जिद-सीएसटी दरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड़
*१२ ऑगस्ट – हार्बरवर मशीद-सीएसटी दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली.
*२६ ऑगस्ट – मध्य रेल्वेवर माटुंगा आणि शीव स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड. पश्चिम रेल्वेवर सकाळी माहीमजवळ गाडीत तांत्रिक बिघाड. संध्याकाळी ग्रँटरोड आणि चर्निरोडजवळ ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड.
*२८ ऑगस्ट – संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास कोल्हापूरकडे जाणाऱ्या सह्यद्री एक्सप्रेसचे इंजिन ठाणे स्थानकात बिघडले.
*१ सप्टेंबर – पश्चिम रेल्वेवर मोटरमनने लाल सिग्नल मोडल्याने गाडी काही काळ खोळंबली.
*२ सप्टेंबर – विक्रोळी- घाटकोपर दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2014 3:12 am

Web Title: central railway disordered
टॅग : Central Railway
Next Stories
1 विद्यार्थ्यांचा रेल्वे रुळावर विदारक अंत
2 मोडकसागरमध्ये लेक टॅपिंग यशस्वी
3 वीजसंच कोळशावर सुरू करा
Just Now!
X