ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बरवरील फे ऱ्यांत वाढ नाही

मुंबई : लोकल प्रवासाची परवानगी असलेल्या अत्यावश्यक प्रवाशांच्या यादीत दररोज भर पडत असल्याने प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा भार पेलण्यासाठी पश्चिम रेल्वेपाठोपाठ मध्य रेल्वेनेही गुरुवारपासून लोकल

फेऱ्यांमध्ये वाढ के ली. मुख्य मार्ग आणि हार्बरवर आणखी ६८ लोकल फे ऱ्यांची भर पडल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. परंतु ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बवरील लोकल फे ऱ्यांमध्ये वाढ न के ल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळालेला नाही.

सध्या मध्य रेल्वेवर एकू ण ३५५ फेऱ्या धावत होत्या. ६८ फे ऱ्यांची भर पडल्याने त्याची संख्या ४२३ झाली आहे. वाढ करण्यात आलेल्या फेऱ्यांमध्ये मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ४६ आणि हार्बरवर २२ फेऱ्यांचा समावेश आहे. मुख्य मार्गावर अप-डाऊनला कसारा, अंबरनाथ, कल्याण, ठाणे, कु र्ला स्थानकांसाठी फे ऱ्या असून कसारा ते कर्जत, ठाणे ते कर्जत, कल्याण ते कर्जत या फे ऱ्यांमध्ये वाढ असल्याचे सांगितले. तर हार्बरवरील पनवेल मार्गावर १४ आणि उर्वरित वाशी मार्गावर ८ फेऱ्या आहेत. या फेऱ्यांमध्ये वाढ झाल्याने कल्याणमधून सुटणाऱ्या व कल्याणला येणाऱ्या सर्वाधिक ८२ फेऱ्या होतील. ठाण्यासाठी ७२, कर्जतसाठी ४५, कसारासाठी ४१ फेऱ्या, डोंबिवली व बदलापूरसाठी प्रत्येकी २४ फे ऱ्या आहेत. उर्वरित अंबरनाथ, टिटवाळा, कुर्ला यांसाठी आहेत.

प्रवासी संख्या वाढता वाढे…

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावरून सुरुवातीला के वळ मंत्रालय, पोलीस, पालिका कर्मचारी, शासकीय व खासगी रुग्णालयांतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करत होते. यासाठी मध्य रेल्वेने २०० लोकल फे ऱ्या चालवल्या. ३० जूनपर्यंत मध्य रेल्वेवरील प्रवासी संख्या ५४,१८७ होती. १ जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांबरोबरच राष्ट्रीयीकृत बँका, टपाल, सीमाशुल्क विभाग, मुंबई पोर्ट ट्रस्ट यांनाही लोकल प्रवासाची मुभा दिली. त्या वेळी मध्य रेल्वेने १५० फे ऱ्या वाढवल्या. त्यामुळे एकू ण

फे ऱ्यांची संख्या ३५० झाली. जुलै महिन्यात प्रवासी संख्या ६४ हजारांपर्यंत पोहोचली. सप्टेंबर महिन्यापासून सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वाढ करण्यात आली, तर याच महिन्यात सरकारी, खासगी रुग्णालय प्रयोगशाळा व पॅथॉलॉजी कर्मचारी, खासगी वीजपुरवठा कर्मचाऱ्यांनाही लोकल प्रवासाची परवानगी दिली. आता खासगी बँक कर्मचारी व सहकारी बँक कर्मचाऱ्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळाली. त्यामुळे मध्य रेल्वेवरील प्रवासी संख्या दीड लाखांपर्यंत गेली आहे.