05 June 2020

News Flash

टपावरील प्रवासी पेंटाग्राफला चिकटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

धीम्या मार्गावरील काही गाड्या जलद मार्गावर वळविण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकावर गाडीच्या छतावरून प्रवास करणारा एक प्रवासी पेंटाग्राफला चिटकल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावरील वाहतूक सध्या विस्कळीत झाली आहे. डाऊन मार्गावरील अनेक गाड्यांचा खोळंबा झाला असून मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांवर प्रवासी ताटकळत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, धीम्या मार्गावरील काही गाड्या जलद मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. दरम्यान, थोड्यावेळापूर्वी वाहतूक पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2016 10:28 pm

Web Title: central railway locals running late
Next Stories
1 गांधी परिवाराचा इतिहास ऋषी कपूर यांना माहिती नाही – निरूपम
2 Neet Exam: ‘नीट’वरून मोदींशी बोलल्याचा राजकीय अर्थ काढू नका – राज ठाकरे
3 ‘अॅपल’चे ‘सीईओ’ कूक यांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
Just Now!
X