मुंबई : रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेच्या तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे ते कल्याण डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बरवर शनिवारी मध्यरात्री कुर्ला ते वाशीदरम्यान अप व डाऊन मार्गावर ब्लॉकचे काम चालेल. पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

मध्य रेल्वे- मुख्य मार्ग

’कधी : रविवार, ११ नोव्हेंबर, स. १०.३० ते दु. ३.००

’कुठे : ठाणे ते कल्याण डाऊन जलद मार्ग

’परिणाम : ठाणे येथून सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल फेऱ्या कल्याणपर्यंत डाऊन धिम्या मार्गावर चालविण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून सुटणाऱ्या जलद व अर्धजलद लोकल फेऱ्या घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड स्थानकांत थांबतील. अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील लोकल फेऱ्या दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावतील.

हार्बर मार्ग

’कधी : शनिवार, १० नोव्हेंबर. म.रा. १.३० ते प. ६.०० वा.

’कुठे : कुर्ला ते वाशी अप व डाऊन मार्ग

’परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल, बेलापूर, वाशीपर्यंतच्या लोकल फेऱ्या पहाटे ४.३२ ते सकाळी ५.१८ रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय वाशीहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल प. ४.०३ वा., बेलापूरहून प. ३.५१ वा  सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.