आगामी गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून आणखी काही विशेष गाडय़ा चालविण्यात येणार आहेत. मुंबई ते मडगावदरम्यान (गाडी क्रमांक ०१०३३) २३ ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०१४ या कालावधीत विशेष गाडी चालविण्यात येईल. ही गाडी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून रात्री १२ वाजून २० मिनिटांनी सुटणार असून ती दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजून १० मिनिटांनी मडगावला पोहोचेल. गुरुवार वगळता अन्य सर्व दिवस ही गाडी चालविण्यात येणार आहे. मडगाव ते मुंबई (गाडी क्रमांक ०१०३४) दरम्यान चालविण्यात येणारी गाडी मडगाव येथून दुपारी २.४० ला सुटेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल येथे थांबा देण्यात आला आहे.
मुंबई ते करमाळी (गाडी क्रमांक ०१०४१) ही गाडी दर मंगळवार आणि रविवार या दिवशी चालविण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसहून रात्री १२.५० वाजता ही गाडी सुटणार आहे. २३, २६, ३० ऑगस्ट व २, ६, ९, १३ सप्टेंबर या तारखांना ही गाडी सुटेल. तर करमाळी ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (गाडी क्रमांक ०१०४२) दरम्यान दर बुधवार आणि रविवार विशेष गाडी चालविण्यात येणार आहे.  करमाळी येथून सकाळी १०.०० वाजता सुटणारी ही गाडी त्याच दिवशी रात्री ११.२० वाजता मुंबईत पोहोचणार आहे. या गाडय़ा २४, २७ व ३१ ऑगस्ट तसेच ३, ७, १०, १४ सप्टेंबर २०१४ या दिवशी चालविण्यात येणार आहेत. दादर, ठाणे, पनवेल येथे (०१०४१ गाडीसाठी) थांबे देण्यात आले आहेत. या सर्व गाडय़ांचे आगाऊ आरक्षण १९ जुलैपासून सुरू होणार आहे.