मुंबईसह ठाणे, कोकण परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने एक रेल्वे रद्द केली असुन, सात रेल्वे अल्प काळासाठी रद्द केल्या आहेत. अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.
Sunil Udasi, Chief Public Relations Officer, Central Railway: One train cancelled & seven short terminated today, due to very heavy rains in Mumbai area. #MumbaiRains pic.twitter.com/Sl093D06Ao
— ANI (@ANI) July 2, 2019
याशिवाय मुंबईतील हार्बर मार्गावरील रेल्वे सेवेवर देखील पावसाचा परिणाम झाला आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये सुटी जाहीर केली असून अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असे राज्य शासनातर्फे कळविण्यात आले आहे.
पश्चिम रेल्वे सेवा देखील काही काळासाठी विस्कळीत झाली होती. रेल्वे लाइन पाण्याखाली आल्याने रेल्वेची गती मंदावली होती. मात्र हळूहळू पाणी ओसरत असल्याने आता ही रेल्वे सेवा सुरू होत आहे. तरी देखीप काही रेल्वे उशीराने धावत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 2, 2019 1:36 pm