26 February 2021

News Flash

मध्य रेल्वेवरील फलाट आता सुरक्षित

धोकादायक २५९ ठिकाणांवर उंचीत वाढ

धोकादायक २५९ ठिकाणांवर उंचीत वाढ

लोकल आणि फलाटामधील धोकादायक अंतरामुळे प्रवाशांचे जीव धोक्यात येत असल्याच्या तक्रारींच्या पाश्र्वभूमीवर मध्य रेल्वेने २५९ फलाटांची उंची वाढवली आहे. यापूर्वी पश्चिम रेल्वेनेही फलाटांची उंची वाढवली आहे.

रेल्वे फलाट आणि लोकलमधील धोकादायक अंतरामुळे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्येची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली. न्यायालयाने फलाटांच्या उंचीबाबत दिलेल्या आदेशानंतर पश्चिम आणि मध्य रेल्वे प्रशासनाने अखेर फलाटांची उंची वाढवली आहे. याबाबत नेमण्यात आलेल्या समितीच्या शिफारशीनुसार त्यापूर्वी उंची ७६० ते ८४० मिमीवरून वाढवून ९०० ते ९२० मिमी इतकी करण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते डहाणूपर्यंत कमी उंची असणाऱ्या सर्व म्हणजे १६६ फलाटांची उंची वाढवण्यात आली आहे. तर मध्य, हार्बर मार्गावरील कमी उंची असलेल्या २५९ फलाटांची उंची वाढवण्यात आली आहे. तीनही मार्गावर अनेक स्थानकांवरील फलाट आणि लोकलमध्ये साधारण १०० मिमी इतके अंतर होते. त्यामुळे लोकलमध्ये चढताना आणि उतरताना प्रवासी रूळ आणि फलाट यांमध्ये पडून अपघात झाले आहेत. ११ जानेवारी २०१४ रोजी घाटकोपर प्लॅटफॉर्मवर लोकल पकडत असताना तोल सुटल्याने मोनिका मोरे या तरुणीस हात गमवावे लागले होते. त्यानंतर फलाटांच्या उंचीबाबत रेल्वे प्रशासनावर टीकेची झोड उठली होती.

फलाटांची उंची वाढवण्याच्या कामासाठी रात्रीचे काही तासच मिळत होते. कमी कालावधीमुळे सर्व काम पूर्ण होण्यास अधिक कालावधी लागला, अशी माहिती ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2018 1:53 am

Web Title: central railway platform
Next Stories
1 मुंबई-पुणे प्रवास आणखी जलद; द्रुतगती मार्गावर नवीन मार्गिका
2 मेट्रो-२ बी विरोधातील याचिकेसाठी १० हजार कोटींच्या अनामत रकमेची मागणी
3 कळसकरचा ताबा घेण्यासाठी सीबीआयला प्रतीक्षा
Just Now!
X