दिवा स्थानकाजवळ बुधवारी सकाळी एक्स्प्रेस गाडीचे इंजिन बंद पडल्याने मध्य रेल्वेमार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत झाली आहे. आज सकाळी ७.३० वाजता प्रतापगढ एक्स्प्रेस गाडीचे हे इंजिन तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ट्रॅकवर अडकून पडले होते. त्यामुळे मुंबईच्या दिशेेने येणाऱ्या जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सकाळच्या ऐन धावपळीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना काहीवेळ गैरसोयीचा सामना करावा लागला. मात्र, आठ वाजण्याच्या सुमारास इंजिनाच्या दुरूस्तीचे काम पूर्ण करण्यात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.
सविस्तर वृत्त थोड्याचवेळात...
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 13, 2016 8:47 am