मध्य रेल्वेवरील मांटुगा स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे.

शुक्रवारी सकाळी ६ च्या सुमारास मध्य रेल्वेवरील माटुंगा स्थानकावजीक सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे मध्य रेल्वेवरील अप धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान, गेले २० ते २५ मिनिटं ट्रेन एकाच ठिकाणी थांबून असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच रेल्वे स्थानकावर यासंदर्भातील उद्घोषणा करण्यात येत आहे.

दरम्यान, बिघाड दुरूस्त करण्याचे काम मध्य रेल्वेकडून हाती घेण्यात आले आहे.