मध्य रेल्वेवरील वाहतूक ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली आहे. शुक्रवारी सकाळी खर्डी स्थानकात भूसावळ- पुणे एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने कसारा – आसनगाव या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

भूसावळवरुन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये खर्डी स्थानकाजवळ बिघाड झाला. यामुळे कसारा – आसनगाव मार्गावर मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली. एक्स्प्रेसच्या मागे एक लोकलही खोळंबल्याचे वृत्त आहे. यामुळे कसारा ते आसनगाव या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

दरम्यान, लांबपल्ल्याच्या गाड्यांना होणाऱ्या खोळंब्याचा परिणाम मुंबईतील लोकलच्या वेळापत्रकावर होतो. मध्य रेल्वेच्या गाडय़ांच्या वक्तशीरपणाची सरासरी टक्केवारी देशात ७२.३३ आहे. त्यामुळे रेल्वेच्या देशातील ६९ विभागांमध्ये मध्य रेल्वे वक्तशीरपणात ५५व्या क्रमांकावर आहे. मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील गाडय़ांचा वक्तशीरपणा ७० टक्क्यांवर आला असून तो येत्या नोव्हेंबपर्यंत ९० टक्के झाला पाहिजे, असा सज्जड दम गोयल यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला.