News Flash

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, एक्स्प्रेसचं इंजिन बंद पडल्याने प्रवाशांचा खोळंबा

जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. डोंबिवली-ठाकुर्ली स्थानकांदरम्यान एक्स्प्रेसचं इंजिन बंद पडल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक जवळपास अर्धा तास उशिराने सुरु आहे. पाटणा एक्स्प्रेसचं इंजिन बंद पडल्यामुळे जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे. कल्याणहून मुंबईकडे येणारी वाहतूक धीम्या मार्गावर वळवली आहे. इंजिनमधील बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र यामुळे अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 11:37 am

Web Title: central railway service disrupt sgy 87
Next Stories
1 अळूचं फदफदं हवं की मिरचीचा ठेचा? मनसे नेत्याने ट्विट करत दिले मोठ्या बदलाचे संकेत
2 उच्च न्यायालयाबाहेर वकिलांचे राज्यघटना प्रस्तावना वाचन
3 नियमभंगाकडे लक्ष कुणाचे?
Just Now!
X