21 September 2020

News Flash

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, डोंबिवली स्थानकावर संतप्त प्रवाशांच्या घोषणा

मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक १५ मिनिटं उशिराने सुरु आहे

(संग्रहित छायाचित्र)

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान रुळाला तडा गेल्याने ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक १५ मिनिटं उशिराने सुरु आहे. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या सर्व जलद गाड्यांची वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे. यामुळे अनेक प्रवाशांना कामावर पोहोचण्यास उशीर होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. डोंबिवली स्थानकावर काही प्रवाशांनी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. तसंच नेत्रावती एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्यानेही वाहतुकीवर परिणाम झाला असून ठाण्याहून सीएसएमटीकडे येणारी जलद वाहतूक ठप्प आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2019 12:00 pm

Web Title: central railway service disrupt trains running late sgy 87
Next Stories
1 लालबागचा राजा मंडळाला सहा वर्षांमध्ये 60 लाखांचा दंड
2 समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी कर्ज मंजुरीची उद्दिष्ट्यपूर्ती
3 पूरपरिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शाश्वत पुनर्वसन आराखडा – मुख्यमंत्री
Just Now!
X