मध्य रेल्वेवर अभियांत्रिकी कामे करण्यात येणार असल्याने रविवारी कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर रेल्वेमार्गावरही नेरूळ ते मानखुर्द स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार असून पश्चिम रेल्वे मार्गावर मात्र मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही.

* मध्य रेल्वे
* कुठे – कल्याण ते ठाणे जलद मार्ग
* कधी – सकाळी ११.२२ ते दुपारी ३.४२
* परिणाम – मेगाब्लॉकमुळे सकाळी ११.२२ पासून ते दुपारी ३.४२ वाजेपर्यंत कल्याणहून सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गाडय़ा कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरून वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे या गाडय़ा दोन्ही स्थानकादरम्यान सगळ्या स्थानकांवर थांबतील. ठाण्यानंतर या पुन्हा जलद मार्गावर वळवण्यात येतील व त्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा या स्थानकांवर थांबतील. मेगाब्लॉकमुळे गाडय़ा निर्धारित वेळेच्या २० मिनिटे उशिराने धावतील. तर सकाळी १०.०८ ते दुपारी २.४२ वाजेपर्यंत सीएसटीहून कल्याणच्या दिशेने सुटणाऱ्या सगळ्या गाडय़ा ठाण्यानंतर धिम्या मार्गावर वळवण्यात येतील व त्या सगळ्या स्थानकांवर थांबतील. त्यामुळे या गाडय़ा १५ मिनिटे निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावतील. रत्नागिरी-दादर पॅसेंजर दिवा स्थानकातच थांबवण्यात येईल आणि तेथूनच ती रवाना होईल.

* हार्बर रेल्वे
* कुठे – नेरूळ आणि मानखुर्द अप आणि डाऊन मार्ग
* कधी – सकाळी ११.०० ते दुपारी ३.००
* परिणाम – सकाळी १०.१२ पासून ते दुपारी २.४५ वाजेपर्यंत सीएसटीहून पनवेल, बेलापूर आणि वाशीसाठी सुटणाऱ्या तसेच तेथून सीएसटीकडे येणाऱ्या दोन्ही मार्गावरच्या गाडय़ांची वाहतूक १०.२० ते ३.०० वाजेपर्यंत बंद राहील. यादरम्यान, सीएसटी ते मानखुर्द आणि ठाणे ते पनवेलदरम्यान काही खास गाडय़ा सोडण्यात येतील. हार्बरच्या प्रवाशांना मेन लाइनवरून आणि ट्रान्सहार्बर रेल्वेमार्गावरून प्रवास करण्याची परवानगी असेल.