मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याचं वृत्त झालं आहे. मध्य रेल्वेच्या खडवली-टिटवाळा स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याची माहिती असून याचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झालाय.  

मेगा ब्लॉकमुळे आधीच वेग मंदावलेल्या मध्य रेल्वे मार्गावर खडवली-टिटवाळा स्थानकांदरम्यान तडा गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. अशातच आज मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक असल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

मेगाब्लॉक – मध्य रेल्वे मुख्य मार्गावर मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्ग, सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे अप व डाऊन मार्गावर ब्लॉक असेल. हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून विशेष लोकल फे ऱ्या चालवण्यात येणार आहेत. रत्नागिरी ते दादर पॅसेंजर गाडी दिवा स्थानकापर्यंतच चालवण्यात येईल आणि ही गाडी दिवा स्थानकातून सुटेल. पश्चिम रेल्वेवर मात्र ब्लॉक नसल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल. वांद्रे टर्मिनस यार्डमध्ये ६ तारखेच्या मध्यरात्री जम्बो ब्लॉक घेणार असून यामुळे लोकल गाडय़ांवर परिणाम होणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले.

मध्य रेल्वे-मुख्य मार्ग

कुठे -मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्ग

कधी – स.११.३० ते सायं.४.०० वा.

परिणाम – कल्याणहून सुटणाऱ्या जलद लोकल दिवा ते परळ स्थानकादरम्यान धिम्या मार्गावर धावतील. परळनंतर लोकल पुन्हा जलद मार्गावर पूर्ववत होणार आहेत. सीएसएमटीहून सुटणाऱ्या जलद आणि अर्ध जलद लोकल ब्लॉकवेळी घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्थानकात थांबणार आहेत.

हार्बर रेल्वे

कुठे – सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे अप व डाऊन मार्ग

कधी – अप मार्ग-स.११.१० ते दु. ३.४० वा. आणि डाऊन मार्ग- स. ११.४० ते सायं. ४.१० वा.

परिणाम – ब्लॉकदरम्यान सीएसएमटी, वडाळा ते वाशी, बेलापूर, पनवेल, वांद्रे, गोरेगाव दरम्यानच्या दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.