28 May 2020

News Flash

मुंबईत पावसाची विश्रांती; लोकल हळू-हळू पूर्वपदावर

आषाढी एकदशीपासून पावसाने मुंबईत जोर धरला तो शुक्रवारपर्यंत कायम राहीला आहे. मध्यरात्रीपासून मुंबई उपनगरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

| July 11, 2014 10:04 am

आषाढी एकदशीपासून जोर धरलेल्या पावसाने सध्या विश्रांती घेतली असून रखडलेली ‘लाईफ लाईन’ही पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. 
परंतु, येत्या २४ तासांत महाराष्ट्रभर मुसळधार होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविलेली आहे.   मुंबईत मुसळधार पावसाने रेल्वे सेवेला चांगलेच झोडपले होते. कुर्ला स्थानकावर रेल्वेरुळांवर पाणी साचल्याने हार्बर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती, तर मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे सेवाही विस्कळीत झाली होती. दुपारनंतर वरुणराजाने विश्रांती घेतल्याने आता रेल्वेसेवा पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. तसेच ठीकठीकाणी साचलेल्या पाण्याचा निचराही झाला आहे. त्यामुळे संध्याकाळच्या सुमारास घरी परतणाऱया चाकरमान्यांना हे दिलासादायक ठरणारे आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2014 10:04 am

Web Title: central railway trasport discrupt dure to rain
टॅग Mumbai Rain,Railway
Next Stories
1 ‘एम इंडिकेटर’ अद्ययावत झाले; मोनो, मेट्रो, फेरीबोटींचे वेळापत्रक आणि पावसाचे अपडेट्सही
2 नसली वाडिया यांची साक्ष होणार!
3 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय विम्याचे संरक्षण
Just Now!
X