कसारा इगतपुरी रेल्वे मार्गावर पावसामुळे मातीचा ढिगारा साठला आहे. हा ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. मात्र ढिगाऱ्याचा फटका वाहतुकीला बसला आहे. कसाऱ्याहून इगतपुरीकडे जाणारी रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेकडून हा ढिगारा बाजूला करण्याचं काम सुरू आहे. दुसऱ्या ट्रॅकवरून वाहतूक वळवली असल्याचं मध्य रेल्वेने म्हटलं आहे.

पावसामुळे मध्य रेल्वेचा खोळंबा होणं ही काही मुंबईकरांसाठी आता नवी बाब राहिलेली नाही. पहिल्याच पावसात मध्ये रेल्वेच्या सेवेची या पावसाने दाणादाण उडवली होती. मुंबईत २ जुलै रोजी झालेल्या पावसानंतर १६ तास मध्य रेल्वे बंद होती. यावरूनच एक पाऊस काय काय करू शकतो याचा अंदाज येतो त्यानंतरही ही सेवा पूर्ववत व्हायला पाच दिवस लागले होते. आता पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर मातीचा ढिगारा साठला आहे. हा ढिगारा काढेपर्यंत कसारा ते इगतपुरी दरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे असे मध्य रेल्वेने म्हटले आहे.