News Flash

मध्य, पश्चिम रेल्वेकडून ३९ मेल-एक्स्प्रेस रद्द

काही प्रवाशांनी आरक्षण केले होते त्यांना मात्र मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

आजपासून २ एप्रिलपर्यंत अंमलबजावणी; करोनामुळे गाडय़ांना प्रतिसाद नसल्याचे कारण

मुंबई : करोनामुळे अनेकांकडून बाहेरगावी जाणे टाळले जात आहे.  खबरदारीचे उपाय म्हणून मध्य रेल्वेने २३ आणि पश्चिम रेल्वेने १० अशा एकूण ३३ मेल-एक्स्प्रेस १८ मार्च ते २ एप्रिल दरम्यान न चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये मध्य रेल्वेवरील मुंबई ते पुणे दरम्यानच्या डेक्कन एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, मुंबई ते नागपूर दरम्यानची नंदीग्राम एक्स्प्रेस यासह पश्चिम रेल्वेवरील दुरोन्तो व हमसफर गाडय़ांचा समावेश आहे. ज्या काही प्रवाशांनी आरक्षण केले होते त्यांना मात्र मनस्ताप सहन करावा लागणार आहे. आरक्षण केलेल्या प्रवाशांना तिकिटाचा परतावा देण्यात येईल, असे  स्पष्ट करण्यात आले.

कोकण रेल्वेकडूनही उपाययोजना

करोनासंदर्भात कोकण रेल्वेनेही उपाययोजना सुचविल्या आहेत. यात मेल-एक्स्प्रेसमधील वातानुकूलित डब्यातून ब्लँकेटची सुविधा काढण्यात आल्याचे सांगितले. चिपळूण, रत्नागिरी, वेरणा, मडगाव, कारवार, उडुपी येथे वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील रुग्णालयांशीही संपर्क साधून सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना केल्याचे सांगण्यात आले.

मध्य रेल्वेवरील २९ रद्द गाडय़ा

 • ११००७ व ११००८ मुंबई ते पुणे ते मुंबई डेक्कन एक्स्प्रेस-१८ ते ३१ मार्च
 • ११२०१ एलटीटी-अजनी एक्स्प्रेस-२३ आणि ३० मार्च
 • ११२०२ अजनी ते एलटीटी एक्स्प्रेस- २० आणि २७ मार्च
 • १२२०५ एलटीटी ते निजामाबाद एक्स्प्रेस- २१ आणि २८ मार्च
 • १२२०६ निजामाबाद ते एलटीटी एक्स्प्रेस- २२ आणि २९ मार्च
 • २२१३५ आणि २२१३६ नागपूर ते रेवा एक्स्प्रेस- २५ मार्च
 • ११४०१ मुंबई ते नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस २३ मार्च ते १ एप्रिल
 • ११४०२ नागपूर ते मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस  २२ ते ३१ मार्च
 • ११४१७ पुणे ते नागपूर एक्स्प्रेस २६ मार्च आणि २ एप्रिल
 • ११४१८ नागपूर ते पुणे एक्स्प्रेस २० आणि २७ मार्च
 • २२१३९ पुणे ते अजनी एक्स्प्रेस २१ आणि २८ मार्च
 • २२१४० अजनी ते पुणे एक्स्प्रेस २२ आणि २९ मार्च
 • १२११७ आणि १२११८ एलटीटी ते मनमाड एक्स्प्रेस १८ ते ३१ मार्च
 • १२१२५ आणि १२१२६ मुंबई ते पुणे ते मुंबई प्रगती एक्स्प्रेस १८ मार्च ते १ एप्रिल
 • २२१११ भुसावळ ते नागपूर एक्स्प्रेस १८ ते २९ मार्च
 • २२११२ नागपूर ते भुसावळ एक्स्प्रेस १९ ते २३ मार्च
 • ११३०७ आणि ११३०८ कलबुर्गी ते सिकंदराबाद एक्स्प्रेस – १८ ते ३१ मार्च
 • १२२६१ मुंबई ते हावडा दुरोन्तो एक्स्प्रेस-२५ आणि १ एप्रिल
 • १२२६२ हावडा ते मुंबई दुरोन्तो एक्स्प्रेस- २४ आणि ३१ मार्च
 • २२२२१ सीएसएमटी ते निजामुद्दीन राजधानी – २०, २३, २७ आणि ३० मार्च
 • २२२२२ निजामुद्दीन ते सीएसएमटी राजधानी – २१, २४, २६ आणि ३१ मार्च
 • ८२३५५ पाटणा ते सीएसएमटी सुविधा एक्स्प्रेस-१८ मार्च ते ३१ मार्च
 • ८२३५६ सीएसएमटी ते पाटणा सुविधा एक्स्प्रेस- २० मार्च ते ३१ मार्च
 • २१११ सोलापूर ते नागपूर सुपरफास्ट विकली विशेष- २२ मार्च आणि २९ मार्च
 • २११२ नागपूर ते सोलापूर सुपरफास्ट विकली विशेष-२३ मार्च आणि ३० मार्च
 • २११३ सोलापूर ते नागपूर सुपरफास्ट विकली विशेष- १९ मार्च आणि २६ मार्च
 • २११४ नागपूर ते सोलापूर सुपरफास्ट विकली विशेष- २० मार्च आणि २७ मार्च

पश्चिम रेल्वेच्या रद्द गाडय़ा

 • १२२२७ मुंबई सेन्ट्रल ते इंदौर दुरोन्तो एक्स्प्रेस- २१, २६, २८ मार्च
 • १२२२८ इंदौर ते मुंबई सेन्ट्रल दुरोन्तो एक्स्प्रेस- २२, २७, २९ मार्च
 • २२९२३ वांद्रे टर्मिनस ते जामनगर हमसफर एक्स्प्रेस- २१, २३, २५, २८ व ३० मार्च
 • २२९२४ जामनगर ते वांद्रे टर्मिनस हमसफर एक्स्प्रेस- २२, २४, २६, २९ व ३१ मार्च
 • १२२३९ मुंबई सेन्ट्रल ते जयपूर दुरोन्तो एक्स्प्रेस- २२,  २४, २९, ३१ मार्च
 • १२२४० जयपूर ते मुंबई सेन्ट्रल दुरोन्तो एक्स्प्रेस- २४, २६, ३१ मार्च व २ एप्रिल
 • २२२०९ मुंबई सेन्ट्रल ते नवी दिल्ली दुरोन्तो एक्स्प्रेस- २३,  २७ व ३० मार्च
 • २२२१० नवी दिल्ली ते मुंबई सेन्ट्रल दुरोन्तो एक्स्प्रेस- २१,  २४, २८, ३१ मार्च
 • १९३१७ आणि १९३१८ इंदौर ते पुरी ते इंदौर हमसफर एक्स्प्रेस अनुक्रमे २१ व २८ मार्च आणि २५ मार्च आणि १ एप्रिल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 12:45 am

Web Title: central western railway thirty nine mail express canceled akp 94
Next Stories
1 सरकारच्या आवाहनास उद्योग क्षेत्राचा प्रतिसाद
2 कर्जाच्या थकहमीसाठी सहकारी संस्थांची माहिती सादर करा!
3 coronavirus: ‘या’ कारणामुळे लोकल बंद करण्याचा निर्णय टाळला
Just Now!
X