अत्यावश्यक असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष;  आरोग्य सुरक्षा साधनांअभावी कामगार घरीच

नमिता धुरी, लोकसत्ता

मुंबई : सर्वसामान्यांनी ज्याला कचरा म्हटले ते कोणासाठी तरी सोने ठरले. शिक्षण नाही, नोकरी नाही आणि भूक आहे, अशा महिलांनी कचऱ्याची खरी किं मत ओळखली आणि त्याला आपल्या उपजीविके चे साधन बनवले. मात्र, हे साधन आता टाळेबंदीने हिरावून घेतले आहे. कचरावेचकांचा अत्यावश्यक सेवेत समावेश तर झाला; पण त्यांच्या आरोग्यविषयक सुरक्षेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. शिवाय कचरा कमी झाल्यानेही धंद्याला उतरती कळा लागली आहे. अशा वेळी कचरावेचक महिला आणि त्यांच्याकडून कचरा खरेदी करणारे काटेवाले यांना सामाजिक संस्थांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागत आहे.

मुंबईतील रहिवासी संस्थांमध्ये ओल्या कचऱ्याचे खत तयार के ले जाते. उरलेला सुका कचरा गोळा करण्याचे काम कचरावेचक महिला करतात. हा कचरा वर्गीकरण करून काटेवाल्यांना विकला जातो. कागद, प्लास्टिक इत्यादी कचऱ्याच्या प्रत्येक प्रकाराचे दर ठरलेले असतात. त्यावरच कचरावेचक महिलांचे घर चालते. प्लास्टिकबंदीमुळे प्लास्टिक कचरा कमी मिळू लागला आहे. त्यातच आता टाळेबंदीचे संकट ओढवल्याने एकू णच कचरा कमी झाला. काही रहिवासी संस्था कचरावेचकांना प्रवेश देत नाहीत. या सगळ्यातून मार्ग काढत काम करण्याची महिलांची तयारी आहे. मात्र त्यांना मास्क, सॅनिटायजर, साबण अशी सुरक्षेची साधने पुरवली गेलेली नाहीत. त्यामुळे बऱ्याच महिलांनी घरीच राहणे पसंत के ले आहे. स्वकमाई होत नसल्याने कचरावेचक कामगारांची कु टुंबे कसेबसे दिवस ढकलत आहेत.

गोळा के लेला कचरा पालिके च्या टेम्पोतून वाहून नेला जातो. मात्र सध्या चालकांची कमतरता वगैरे कारणास्तव टेम्पोंची संख्या कमी आहे. त्यामुळे कचरा वाहून कसा न्यायचा हा प्रश्न महिलांसमोर आहे. शिवाय काटेवाल्यांची दुकाने बंद असल्याने कचरा विकण्याचीही सोय नाही. त्यामुळे कचरावेचकांना बेरोजगारीला सामोरे जावे लागत असल्याची माहिती, स्त्रीमुक्ती संघटनेच्या ज्योती म्हापसेकर यांनी दिली. ‘या सर्व महिला दुष्काळग्रस्त भागातून आलेल्या, झोपडपट्टीत राहणाऱ्या आहेत.आकार मुंबई संघटनेतर्फे  अर्ज के लेल्या १ हजार ५० पैकी केवळ ६३ जणींना अत्यावश्यक सेवेचे ओळखपत्र मिळाले. इतरांना ओळखपत्र मिळेपर्यंत घरातच बसावे लागेल’, असे संघटनेच्या शारदा अरोंडेकर यांनी सांगितले.

अंधेरीच्या कचरा वर्गीकरण के ंद्रात काम करणारे राशीद फरीदी सांगतात, टाळेबंदीमुळे ७५ टक्के कचरा कमी झाला. कु रकु रे, चॉकलेट इत्यादी खाद्यपदार्थाची आवरणे सिमेंट कारखान्यांना विकली जातात. मात्र आता दुकान बंद असल्याने नुकसान होत आहे.

संघटनेच्या मागण्या

* चांगल्या दर्जाचे मास्क, हातमोजे, बूट, टॉवेल मिळावेत.

* रहिवासी संस्थांमध्ये कचरावेचकांसाठी हात धुण्याची व्यवस्था असावी.

* पुढील तीन महिने पुरेल असा शिधा आणि सुरक्षा साधने  द्यावीत.

* कचरावेचकांच्या वस्त्यांमध्ये आरोग्य तपासणी शिबीर घ्यावे.