News Flash

‘चैत्यभूमी’ आता टपाल तिकिटावर!

कोटय़वधी आंबेडकरभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या दादर येथील ‘चैत्यभूमी’वर टपाल तिकीट प्रकाशित केले जाणार आहे. येत्या १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी हे तिकीट प्रकाशित

| March 14, 2013 05:37 am

कोटय़वधी आंबेडकरभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या दादर येथील ‘चैत्यभूमी’वर टपाल तिकीट प्रकाशित केले जाणार आहे. येत्या १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी हे तिकीट प्रकाशित केले जाणार असल्याची माहिती जीपीओमधील सूत्रांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पार्थिवावर दादर चौपाटीवर जेथे अंत्यसंस्कार करण्यात आले, तेथे बौद्ध धर्मानुसार एक चैत्यगृह/स्तूप उभारण्यात आला आहे. आधुनिक बौद्ध स्थापत्य कलेचा तो उत्तम नमुना मानला जातो. दरवर्षी ६ डिसेंबर रोजी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने येथे महाराष्ट्र आणि देशभरातून लाखो अनुयायी दर्शनासाठी येत असतात.
येत्या १४ एप्रिल रोजी ‘चैत्यभूमी’वरील या तिकिटाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. ‘चैत्यभूमी’ या वास्तूला ऐतिहासिक महत्त्व असून त्यामुळेच ‘चैत्यभूमी’वर हे तिकिट प्रकाशित केले जाणार आहे. आजवर लाल किल्ला, ताजमहाल, कुतुबमिनार, बोधगया मंदिर (१९५१), सोमनाथ मंदिर (१९६७), जे. जे. कला महाविद्यालय (१९८२), रॉक गार्डन, चंडिगढ (१९८३), टाटा मेमोरियल सेंटर (१९९१) आदी वास्तूंवर या पूर्वी टपाल तिकिट प्रकाशित करण्यात आली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2013 5:37 am

Web Title: chaityabhoomi is now on post tickets
Next Stories
1 शरीरसंबंधाच्या संमतीचे वय सोळा
2 जे सातारा पालिकेला जमते, ते अन्य पालिकांना का जमत नाही?
3 चुकीचा सल्ला देणाऱ्या सल्लागाराला तुटपुंजा दंड
Just Now!
X