लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त यंदा अनुयायांना घरातून महामानवाला अभिवादन करता यावे याकरीता दूरदर्शन सह्यद्री वाहिनीवरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. शासकीय मानवंदना व हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण समाजमाध्यमांवरही केले जाणार आहे.

Founder and CEO of Cafe Mutual Prem Khatri
बाजारातली माणसं : फंड वितरकांचा हक्काचा माणूस- प्रेम खत्री
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण

दादर चैत्यभूमी येथे दरवर्षी महापरिनिर्वाणदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. त्यानिमित्ताने चैत्यभूमी परिसरात रंगरंगोटी, दिवाबत्ती, पुष्प सजावट केली जाते. चैत्यभूमी येथे करण्यात आलेल्या तयारीसह थेट प्रक्षेपण व्यवस्थेची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल आणि सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे—पाटील यांनी गुरूवारी सायंकाळी संयुक्त पाहणी केली. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, महानगरपालिका उपायुक्त विजय बालमवार,  प्रसारभारतीचे डॉ. अश्विनी कुमार, पोलीस उपायुक्त प्रणय अशोक, महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान खात्याचे संचालक तथा सहाय्यक आयुक्त शरद उघडे, जी—उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर  यांच्यासह महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे दरवर्षी पुरविण्यात येणाऱ्या नागरी सेवा—सुविधा यंदा कोरोना पाश्र्वभूमीवर दिल्या जाणार नाहीत.

यंदा कोरोना विषाणू संक्रमण पाहता, मोठय़ा संख्येने एकत्र येणे धोक्याचे ठरू शकते. या पाश्र्वभूमीवर देशभरातील अनुयायांनी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे न येता आपापल्या घरी राहून तसेच स्थानिक परिसरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्यक्ष चैत्यभूमीवर न येता देखील अनुयायांना अभिवादन करता यावे यासाठी चैत्यभूमीवरील शासकीय मानवंदना व पुष्पवृष्टीचे थेट प्रक्षेपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या समाजमाध्यम खात्यांवरून आणि दूरदर्शनच्या सह्यद्री वाहिनीवरुन करण्यात येणार आहे.

अभिवादनासाठी लिंक

थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या सह्यद्री वाहिनीवरून सकाळी ७.४५ ते ९ या कालावधीमध्ये केले जाणार आहे. त्यानंतर, सकाळी ९.५०, १०.५०, ११.५० तसेच दुपारी १२.५० वाजता दर दहा मिनिटांसाठी थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, अशी माहिती दूरदर्शनच्या मुंबई केंद्राद्वारे देण्यात आली आहे.सोबत विविध समाजमाध्यमांवरही हे प्रक्षेपण पाहून अभिवादन करता येणार आहे. त्यासाठी यूटय़ूब: bit.ly/abhivadansqsqyt / फेसबूक: bit.ly/abhivadansqsqfb / dMÐUMS: bit.ly/abhivadansqsqtt या लिंकचा उपयोग करता येईल.