News Flash

अर्थव्यवस्था रुळांवर आणण्याचे आव्हान : उपमुख्यमंत्री

या आव्हानांवर सरकार लवकरात लवकर मात करू शकेल,

संग्रहित छायाचित्र

करोनावर मात आणि अर्थव्यवस्था रुळावर आणणे ही दोन आजघडीला राज्यासमोरची प्रमुख आव्हाने आहेत. नागरिकांनी आणखी काही दिवस घरातच थांबून करोनाचा प्रसार रोखला तर या आव्हानांवर सरकार लवकरात लवकर मात करू शकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी व्यक्त केला.

राज्यातील करोना रुग्णसंख्येत दररोज होणारी वाढ थांबविणे, दररोज वाढणारे मृत्यू रोखणे, आरोग्य, पोलीस, अन्य यंत्रणांवरचा ताण कमी करणे, टाळेबंदीने ठप्प झालेली अर्थव्यवस्था रुळावर आणणे ही सरकारसमोरील प्रमुख आव्हाने असून, त्यावर लवकरात लवकर मात करण्यासाठी नागरिकांनी संयम व शिस्त पाळली पाहिजे. करोनाचा प्रसार पाहता हा विषाणू आपल्या गावात, वस्तीत, सोसायटीत पोहोचला आहे. त्याला स्वत:च्या घरात न आणणे, स्वत:ला, कुटुंबाला त्याची लागण होऊ न देणे हे आता प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आणखी काही दिवस घराबाहेर पडणे टाळले तर, करोना आटोक्यात येऊ शकेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

आर्थिक चित्र गंभीर

करोना आटोक्यात आणण्याबरोबरच अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे आव्हान असल्याची कबुली अजितदादांनी दिली. महसुली तूट वाढत असून, करोनामुळे महसुलावर मोठा परिणाम झाला आहे. या महिन्यात तर सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन दोन टप्प्यांमध्ये देण्याची सरकारवर वेळ आली. यातून सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्चाला उपलब्ध होतील. याशिवाय दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित वेतन कधी देणार याची काहीच माहिती देण्यात आलेली नाही. मार्चअखेर विविध खात्यांना निधी दिला जातो. यंदा करोनामुळे मार्चच्या दुसऱ्या आठवडय़ापासून सारे व्यवहार ठप्प झाले. मार्चअखेर वसुलीही झाली नाही. यामुळे सरकारी तिजोरीत खडखडाट आहे. २०२०-२१ या नव्या आर्थिक वर्षांत तर चित्र अधिक गंभीर असेल. विकासकामांवर त्याचा नव्या वर्षांत मोठय़ा प्रमाणावर परिणाम होईल, अशी चिन्हे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 12:33 am

Web Title: challenge of bringing the economy on track says ajit pawar abn 97
Next Stories
1 पुन्हा मुख्यमंत्री होण्यात घटनात्मक पेच नाही
2 चिंता वाढली : मुंबईत एकाच दिवसात वाढले १०३ करोना पॉझिटिव्ह, शहरातील संख्या पोहोचली ४३३ वर
3 ..तर रुग्णालयांतील सेवा विस्कळीत होईल!
Just Now!
X