21 September 2020

News Flash

मुंबईत मृत्यूदर कमी करण्याचे आव्हान 

करोनाबळींची संख्या सात हजारांच्या पुढे, २४ तासांत ९७९ रुग्ण

संग्रहित छायाचित्र

मुंबईतील करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असताना मृतांची संख्या मात्र सात हजारांच्या पुढे गेली आहे. मुंबईचा मृत्यूदर ५.५ टक्के  असून तो कमी करण्याचे आव्हान  पालिकेपुढे आहे.

शुक्रवारी ४७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्यानंतर मृतांची एकूण संख्या ७,०३५ वर पोहोचली. त्याचबरोबर ९७९ नवीन रुग्ण आढळले असून ९०७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

मुंबईतील करोना रुग्णसंख्या वाढीचा दर  दिवसेंदिवस कमी होत असून रुग्णसंख्या वाढीचा सरासरी दर ०.८० टक्के  आहे. मात्र मुंबईतील नानाचौक-मलबार हिल, गिरगाव-मुंबादेवी, आणि बोरिवली परिसरात ही रुग्णवाढ सर्वात जास्त म्हणजे १.३ टक्के  इतकी आहे. नानाचौक-मलबार हिल भागात दर आठवडय़ात दररोज सरासरी ५० रुग्णांची भर पडते. तर बोरिवली भागात गेल्या अनेक आठवडय़ांपासून दररोज किमान ७० रुग्णांची नोंद होते आहे. मुंबईतील रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी ८४ दिवसांवर पोहोचला आहे. मात्र १२ विभागांमध्ये हा कालावधी ८४ दिवसांपेक्षा कमी आहे. नानाचौक-मलबार हिल परिसरात हाच दर ५० दिवसांइतका कमी आहे.

शुक्रवारी मुंबईत ४७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यापैकी ३७ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये ३३ पुरुष व १४ महिला होत्या. मृतांचा आकडा सात हजारांच्या पुढे गेला असून त्यात ५० वर्षांपुढील रुग्णांची संख्या ५,००० पेक्षा अधिक आहे. तर ६० ते ७० वयोगटातील मृतांची संख्या सर्वात जास्त म्हणजे २,००० आहे. एकूण मृतांमध्ये ४० टक्के प्रमाण महिलांच, तर ६० टक्के प्रमाण पुरुषांचे आहे.

शुक्रवारी मुंबईतील ९०७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत मुंबईतील एक लाख एक हजार ८६१ रुग्ण म्हणजेच ७९ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. १९ हजार ३५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी सर्वाधिक एक हजारांपेक्षा अधिक रुग्ण बोरिवली परिसरात आहेत.

राज्यातील वाढता मृत्यूदर चिंताजनक

राज्यात गेल्या २४ तासांत ३६४ जणांचा मृत्यू झाला तर १२ हजार ६०८ नवे रुग्ण आढळले. तीन दिवसांत १,१२१ जणांचा मृत्यू झाला असून, वाढता मृत्यूदर हा चिंतेचा ठरला आहे. राज्यात आतापर्यंत ५ लाख ७२ हजार करोनाबाधित आढळले असून, १९ हजार ४२७ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवडाभरात मृत्यूचे प्रतिदिन प्रमाण वाढले आहे.  पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्या तुलनेत आटोक्यात आली असली तरी नाशिक, नगर, जळगाव, कोल्हापूर, नागपूरमधील वाढती रुग्णसंख्या आरोग्य विभागासाठी चिंतेची बाब ठरली आहे.  गेल्या २४ तासात मुंबई ९७९, पुणे ११९२, पिंपरी-चिंचवड ९०६, सोलापूर जिल्हा ४५०, कोल्हापूर जिल्हा ७३२, नागपूर जिल्हा १०३६  नवे  रुग्ण आढळले.

मुंबईतील मृतांची संख्या

० ते ९ वर्षे                        १२

१० ते १९ वर्षे                  २५

२० ते २९ वर्षे                 १०४

३० ते ३९ वर्षे                  २९२

४० ते ४९ वर्षे                ७७६

५० ते ५९ वष               १७३४

६० ते ६९ वर्षे                २,०१२

७० ते ७९ वर्षे               १३७९

८० ते ८९ वर्षे               ५९३

९० ते ९९ वर्षे               ६०

१०० वर्षांपुढील           ० १

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 12:26 am

Web Title: challenge of reducing mortality in mumbai abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 देवेंद्र फडणवीस बिहारचे निवडणूक प्रभारी?
2 आयुक्त बंगल्याच्या दुरुस्तीवर ४० लाख खर्च करण्याचा घाट
3 गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी रेल्वेच्या १८२ विशेष फेऱ्या
Just Now!
X