06 December 2019

News Flash

तीन दिवसांत पावसाची शक्यता

कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यत सोसाटय़ाच्या वाऱ्यासह मध्यम सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे

राज्यातील किमान तापमानात घट होत असली तरी अजून कमाल तापमानाचे आकडे चढेचआहेत. त्याचवेळीअरबी समुद्रात तयार झालेल्या प्रभावी अशा कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात काही ठिकाणी गडगडाटसह किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

अरबी समुद्रात दक्षिण पश्चिमेस तयार झालेल्या प्रभावी अशा कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर पुढील ७२ तासात चक्रीवादळात होण्याची शक्यता असून ते सोमालियाचे दिशेने सरकू शकते. या बदलामुळे पुढील दोन दिवसात रत्नागिरी, सिधुदुर्ग, औरंगाबाद, परभणी, बीड आणि जालना जिल्ह्यत गडगडाटसह किरकोळ पाऊस पडू शकतो.

कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यत सोसाटय़ाच्या वाऱ्यासह मध्यम सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.’ मुंबईचा पारा वाढलेलाच दरम्यान सोमवारी मुंबईच्या कमाल तापमनात वाढ झाली.  सोमवारी मुंबईचे कमाल तापमान ३५.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर किमान तापमान २३.४ अंश होते. राज्यात अजूनही कमाल तापमानात घाट झालेली नाही. सोमवारी सकाळी सर्वाधिक किमान तापमान अहमदनगर येथे १० अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

First Published on December 3, 2019 2:28 am

Web Title: chance of rain in three days akp 94
Just Now!
X