‘माहेरची साडी’ या चित्रपटातून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री अलका कुबल यांना भेटण्याची संधी वाचकांना मिळणार आहे. सिनेमा, नाटक, मालिका अशा विविध माध्यमांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अलका कुबल या ‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये सहभागी होणार आहेत. आज, सोमवारी (१० फेब्रुवारी) कांदिवली पश्चिमेकडील बजाज क्रॉस रोड येथील संदेश भवनमधील ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ या सोने चांदीच्या दागिन्यांच्या दुकानात दुपारी १२ वाजता त्या भेट देणार आहेत. या वेळी ग्राहकांनाही अलका कुबल यांच्याशी संवाद साधता येणार आहे.

‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’च्या सहाव्या पर्वाला दमदार सुरुवात झाली आहे. नेहमीच्या खरेदीबरोबरच बक्षिसाचा दुहेरी आनंद मिळवून देणारा असा हा महोत्सव असून यात बृहन्मुंबई परिसरातील अनेक गृहोपयोगी वस्तूंच्या शोरूम्सनी सहभाग घेतला आहे. या महोत्सवात सहभागी होणाऱ्या ग्राहकांना आकर्षक पारितोषिके जिंकण्याची संधी मिळते.

महोत्सवाच्या अखेरीस सोडतीद्वारे पहिल्या भाग्यवान ग्राहकाला ‘केसरी टूर्स’कडून सहलीचे पॅकेज दिले जाणार आहे. १६ फेब्रुवारीपर्यंत हा खरेदी महोत्सव सुरू राहणार आहे.

‘लेक चालली सासरला’, ‘दुर्गा आली घरा’, ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’, ‘अग्निपरीक्षा’ ‘सुवासिनीची सत्त्वपरीक्षा’, असे अलका कुबल यांचे अनेक चित्रपट खूप गाजले. ‘अमृतवेल’, ‘युगंधरा’, ‘बंदिनी’, ‘येरे येरे पैसा’, ‘आकाशझेप’ अशा दूरचित्रवाणी मालिकांमधून त्या घराघरात पोहोचल्या. काही मराठी चित्रपटांची निर्मितीही त्यांनी केली. बालकलाकार म्हणून व्यावसायिक नाटकांद्वारे आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या अलका यांनी दहावीत असताना ‘चक्र’ या गाजलेल्या हिंदी चित्रपटात भूमिका केली होती. ‘माहेरची साडी’ या चित्रपटाने त्यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेले. महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना उत्कृष्ट अभिनेत्री तसेच विशेष कला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. या फेस्टिव्हलच्या निमित्ताने चाहत्यांना अलका कुबल यांच्याशी संवाद साधता येणार आहे.

कसे सहभागी व्हाल? : ‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये सहभागी असलेल्या दुकानांमध्ये ५०० रुपयांपेक्षा अधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना देयकासोबत एक कूपन दुकानदार देतील. तसेच दागिन्यांच्या ३ हजार रुपयांपेक्षा अधिक खरेदीवर एक कूपन दिले जाईल. कूपन भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे. अर्धवट माहिती भरलेले कूपन स्वीकारले जाणार नाही. ‘ड्रॉपबॉक्स’मध्ये जमा होणाऱ्या कूपनमधून भाग्यवान विजेत्यांची निवड केली जाईल व त्यांची नावे ‘लोकसत्ता मुंबई’मधून प्रसिद्ध केली जातील. अटी लागू आहेत.

प्रायोजक

‘वामन हरी पेठे ज्वेलर्स’ प्रस्तुत आणि ‘रिजेन्सी ग्रुप’ यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’साठी ट्रॅव्हल पार्टनर ‘केसरी टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स’ आहेत. या महोत्सवासाठी ‘वाकडकर ज्वेलर्स’, ‘सी. ए. पेंडुरकर ज्वेलर्स’, ‘एम. व्ही. पेंडुरकर’, ‘अपना बाजार’, ‘राणेज पैठणी’ हे सिल्व्हर पार्टनर आहेत. ‘स्वरा पैठणी’, ‘शिंदे शूज’ आणि ‘असमेरा फॅशन’ गिफ्ट पार्टनर तर, ‘साने केअर’ हार्ट केअर पार्टनर आहेत. ‘एम. के. घारे ज्वेलर्स’, ‘व्ही. एम. मुसुळूणकर ज्वेलर्स’ आणि ‘पांडुरंग हरी वैद्य ज्वेलर्स अ‍ॅण्ड सन्स’ हे फेस्टिव्हलचे गोल्ड पार्टनर आहेत. तसेच ‘एस. ए. इनामदार’, ‘पांडुरंग हरी वैद्य’ आणि ‘व्ही. पी. बेडेकर अ‍ॅण्ड सन्स’ हे पावर्ड बाय पार्टनर आहेत.