26 May 2020

News Flash

हकालपट्टीविरोधात चंदा कोचर उच्च न्यायालयात

न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सोमवारी कोचर यांच्या याचिकेवर सुनावणी झाली.

 

रिझव्‍‌र्ह बँकेला प्रतिवादी करण्याची परवानगी

आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी हकालपट्टी करण्याच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली असून याचिकेत रिझव्‍‌र्ह बँकेला प्रतिवादी करण्यासाठी उच्च न्यायालयाने त्यांना सोमवारी परवानगी दिली.

आपण मुदतपूर्व राजीनामा दिला होता आणि बँकेनेही तो स्वीकारला होता. त्यानंतरही आपली हकालपट्टी करण्यात आल्याचा दावा कोचर यांनी याचिकेत केला आहे. आपली मुदतपूर्व राजीनामा देण्याची विनंती मान्य केल्यावर संदीप बक्षी यांची बँकेचे मुख्य कार्यकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, असेही त्यांनी याचिकेत म्हटले आहे. आपण ऑक्टोबर २०१८ मध्ये राजीनामा दिला होता. त्यानंतर फेब्रुवारी २०१९ मध्ये आपली हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्र बँकेने प्रसिद्ध केले.

न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सोमवारी कोचर यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी कोचर यांची हकालपट्टी करण्यासाठी बँकेने नियमानुसार रिझव्‍‌र्ह बँकेची परवानगी मागितली होती. रिझव्‍‌र्ह बँकेने ती दिल्यानंतर कोचर यांची हकालपट्टी करण्यात आली, असे आयआयसीआय बँकेतर्फेन्यायालयाला सांगण्यात आले. त्यामुळे कोचर या याप्रकरणी दिवाणी दावा दाखल करू शकतात, रिट याचिका करू शकत नाही, असा दावा करत बँकेने त्यांच्या याचिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बँकेच्या या दाव्यानंतर कोचर यांनी रिझव्‍‌र्ह बँकेला त्यात प्रतिवादी करण्यासाठी याचिकेत दुरुस्ती करण्यास परवानगी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. न्यायालयानेही ती मान्य केली.

व्हिडीओकॉन कर्ज घोटाळ्याप्रकरणात त्यांचाही समावेश असल्याचे आरोप झाल्यानंतर कोचर यांनी स्वत:च राजीनामा दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 2:27 am

Web Title: chanda kochhar against high court in high court akp 94
Next Stories
1 जाळ्यात सापडलेल्या १७ ऑलिव्ह रिडलेंना जीवदान
2 दुचाकीचालकांकडून हेल्मेटसक्तीकडे काणाडोळा
3 जमनालाल बजाज पुरस्कार प्रदान
Just Now!
X