25 February 2020

News Flash

नव्यांमुळे जुन्या कार्यकर्त्यांनी घाबरण्याचे कारण नाही

चंद्रकांत पाटील यांचा निष्ठावंतांना दिलासा; हर्षवर्धन पाटील यांचा भाजपप्रवेश

चंद्रकांत पाटील यांचा निष्ठावंतांना दिलासा; हर्षवर्धन पाटील यांचा भाजपप्रवेश

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील नेत्यांची रीघ भाजपमध्ये लागल्यामुळे निष्ठावंतांमध्ये पसरत असलेल्या अस्वस्थतेची दखल घेत भाजपमध्ये नवीन लोक येत असले तरी जुन्या लोकांनी घाबरण्याचे कारण नाही. त्यांच्यावर अन्याय होणार नाही, असा दिलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस इंदापूर विधानसभा मतदारसंघ सोडत नसल्याने भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा हर्षवर्धन पाटील यांनी केली होती. त्यानुसार बुधवारी गरवारे सभागृहात हर्षवर्धन पाटील यांचा भाजप पक्षप्रवेशाचा सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला.

‘हर्षवर्धन पाटील हे अखेर भाजपमध्ये आले. लोकसभा निवडणुकीच्या दोन दिवस आधी जरी ते भाजपमध्ये आले असते तर बारामती लोकसभा मतदारसंघाचा निकाल वेगळालागला असता. हर्षवर्धन खासदार झाले असते, सुप्रिया यांना घरी पाठवले असते, असे पाटील यांनी नमूद केले. हर्षवर्धन यांचा अनुभव लक्षात घेऊन योग्य सन्मान केला जाईल, असे त्यांनी जाहीर केले. इतक्या मोठय़ा प्रमाणावर लोक भाजपमध्ये येत असल्याने महायुतीला २५० जागाही मिळू शकतील, असे भाकीत पाटील यांनी व्यक्त केले.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने लोकांचा कल आहे. राज्यात लोकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवला आहे. प्रामाणिकपणे काम करता येईल असा भाजप हाच पक्ष उरला असल्याने पक्षात प्रवेश केल्याचे हर्षवर्धन यांनी जाहीर केले. शेजारी बारामती मतदारसंघ असल्याने इंदापूरकडे जरा लक्ष द्यावे आणि मतदारसंघाचा पाणीप्रश्न सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली.

पाच वर्षे वाट पाहिल्यावर आता योग्यवेळी हर्षवर्धन यांचा भाजप प्रवेश झाला. अनेक मुख्यमंत्र्यांचे बुलेट प्रूफ जाकीट म्हणून त्यांनी काम केले. विरोधकांशी चांगले संबंध ठेवून सरकारवरील संकट दूर करण्याची त्यांची हातोटी मोठी आहे. हर्षवर्धन यांच्या मतदारसंघविषयक मागण्या पूर्ण करू. महायुतीचे सरकार विधानसभेत भक्कम बहुमताने निवडून येईल व त्यात आता इंदापूरचा समावेश असेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

पश्चिम महाराष्ट्रात भाजपसाठी ताकद लावू- हर्षवर्धन

विनाअट भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू. पुणे जिल्हाच नव्हे तर मंत्री-पालकमंत्री म्हणून १५ वर्षे काम केल्याने पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र संपर्क व जुने संबंध आहेत. पक्षाला ताकद देण्यासाठी त्याचा उपयोग करू, अशी ग्वाही हर्षवर्धन पाटील यांनी दिली. मन मोकळे असले आणि सकारात्मक भूमिका असली की काही अडचण येत नाही. भाजपचे सरकार असतानाही रोज रात्री शांत झोपत होतो, कारण आपल्यावर कसलाही डाग नाही, असे मिश्कील उद्गारही त्यांनी काढले.

First Published on September 12, 2019 3:31 am

Web Title: chandrakant patil give relief to loyalists after harshvardhan patil entry in bjp zws 70
Next Stories
1 ‘वैद्यकीय’च्या विद्यार्थ्यांना सेवासक्ती सुरूच राहणार – महाजन
2 आयारामांबाबत भाजप नेत्यांची पूर्वीची विधाने
3 वर्षभरात पक्षांतरासाठी १९ आमदारांचे राजीनामे
Just Now!
X