04 April 2020

News Flash

मुंबईतही ‘चेंज ऑफ गार्ड’

ब्रिटनच्या राजघराण्याचा राजप्रासाद ‘बकिंगहॅम पॅलेस’ येथे सुरक्षा रक्षकांचे अत्यंत प्रेक्षणीय असे ‘चेंज ऑफ गार्ड’ हे प्रात्यक्षिक होत असते.

 

‘बंकिंगहॅम पॅलेस’च्या धर्तीवर

मुंबई : लंडन येथील बंकिंगहॅम पॅलेसच्या धर्तीवर महाराष्ट्र पोलीस मुख्यालयात ‘चेंज ऑफ गार्ड’ ही अभिनव संकल्पना येत्या महाराष्ट्र दिनापासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी दिली.

ब्रिटनच्या राजघराण्याचा राजप्रासाद ‘बकिंगहॅम पॅलेस’ येथे सुरक्षा रक्षकांचे अत्यंत प्रेक्षणीय असे ‘चेंज ऑफ गार्ड’ हे प्रात्यक्षिक होत असते. आठवडय़ातील ठराविक दिवशी होणारे हे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी स्थानिक जनतेसह जगभरातील पर्यटक उपस्थित राहतात. अशा प्रकारचे प्रात्यक्षिक पोलीस महासंचालक कार्यालय (पोलीस मुख्यालय) येथे झाल्यास हे येथील नागरिकांसह मुंबईस भेट देण्यासाठी येणाऱ्या देश -विदेशातील पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरेल.

गृहमंत्री अनिल देशमुख आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पोलीस महासंचालक कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी या विषयाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. शहीद जवानांच्या सन्मानार्थ पोलीस मुख्यालयात ‘शहीद गॅलरी’ (मार्टिअर्स गॅलरी) स्थापन करण्यात येणार आहे. येत्या १ मेपासून दर रविवारी ‘चेंज ऑफ गार्ड’ पोलीस मुख्यालयासमोरील प्रांगणात आयोजित केले जाणार आहे.  एका पाळीतील सुरक्षारक्षक आपला कार्यभार दुसऱ्या पाळीतील सुरक्षारक्षकांकडे सोपवितात अशी ‘चेंज ऑफ गार्ड’ची संकल्पना आहे. हे होत असताना पोलीस बँडची धून तसेच आकर्षक परेडचे दर्शनही मुंबईकरांना घडणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2020 1:23 am

Web Title: change of guard in mumbai akp 94
Next Stories
1 दिशाभूल केल्याप्रकरणी अवर सचिवांना कारणे दाखवा नोटीस
2 मुंबईचा पारा सलग दुसऱ्या दिवशी चढाच
3 अंधेरी स्थानकात सरकता जिना अचानक उलटा फिरल्याने अपघात; एक जखमी
Just Now!
X