मुंबईबाहेरील अवजड आणि खाजगी वाहनांवर र्निबध

दक्षिण विभागातील वृक्षतोडीवरील बंदी उठवत उच्च न्यायालयाने मेट्रो-३ ला हरिवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे लवकरच मुंबईच्या दक्षिण भागात विविध ठिकाणी खोदकामे सुरु होतील. परिणामी वाहतुकीची होणारी गैरसोय लक्षात घेता मुंबई वाहतूक पोलिस यंत्रणेकडून दक्षिण भागातील वाहतूक व्यवस्थेमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत.

मेट्रो-३ च्या प्रकल्पाच्या कामामुळे मुंबईच्या दक्षिण विभागातील वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. तेव्हा वाहतुकीच्या रहदारीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी मुंबई बाहेरुन येणाऱ्या अवजड आणि खाजगी वाहनांना सकाळी ७ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते ९ याकाळात फक्त वडाळयापर्यतच प्रवेश करता येणार आहे. तसेच कुलाबा, कफ परेड, मरीन ड्राईव्ह, रमाबाई आंबेडकर मार्ग, आझाद मैदान आणि भायखळा पोलीस ठाणे या हद्दीमध्ये या वाहनांच्या पार्किंगवर र्निबध लावण्यात येणार आहेत.

मेट्रो-३ च्या प्रकल्पाअंतर्गत नियोजित गिरगाव व काळबादेवी अशा दोन मेट्रो स्टेशनासाठी खोदकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे गिरगाव चर्च ते सैफी हॉस्पिटल दरम्यानचा आर.आर. मार्ग हा मेट्रो-३चे काम पूर्ण होईपर्यत ‘नो पार्किंग’ करण्यात येणार आहे. जे.एस.एस रोडवरील ठाकूरद्वार ते शामलदास हा मार्ग बस आणि इतर वाहनांकरिता पूर्णत: बंद राहणार आहे. मेट्रो-३च्या भुयारी स्थानकाचे खोदकाम हे वरळी भागातील डॉ. ई. मोझेस रोड व डॉ. अ‍ॅनी बेझंट रोड या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या रस्त्यांवरील काही भाग हा ‘नो करण्यात येणार आहे.

वरळी भागातील नो पार्किंगचीठिकाणे

डॉ. अ‍ॅनी बेझंट मार्ग – सासमिरा जंक्शन ते ग्लॅक्सो जंक्शन, डॉ. ई. मोजेस मार्ग – वरळी नाका ते मांजेकर लेन, मांजेकर लेन ते दैनिक शिवनेर मार्ग (नेहरु सायन्स सेंटर), दैनिक शिवनेर मार्ग ते रखांगी चौक (फेमस स्टुडिओ), जया अ‍ॅटो (महाल्क्षमी पुल) ते रखांगी चौक, दैनिक शिवनेर मार्ग ते जिजामाता नगर, जिजामाता नगर ते म.न.पा इंजिनिअरिंग हब हाऊस,  म.न.पा इंजिनिअरिंग हब हाऊस ते वरळी नाका