News Flash

अन्वय नाईक प्रकरणी आरोपपत्र दाखल, अर्णब गोस्वामींची पुन्हा हायकोर्टात धाव

अलिबाग सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी १७ डिसेंबरला होणार

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केलं. ज्यानंतर रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला आहे. अलिबाग सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी १७ डिसेंबर ही तारीख दिली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी ६५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. आरोपपत्राची दखल घेऊ नये असे निर्देश अलिबाग कोर्टाला द्यावेत अशी विनंती अर्जाद्वारे अर्णब गोस्वामी यांनी केली आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याची मागणी करत रिपब्लिक टिव्हीचे अर्णब गोस्वामी यांनी गुरूवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासह तपासाची संपूर्ण प्रक्रिया स्थगित करण्याची मागणीही मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी रायगड पोलिसांनी हे आरोपपत्र दाखल केले आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईतील ५२ वर्षीय इंटिरियर डिझायनर (अंतर्गत वास्तुसजावटकार) अन्वय नाईक यांनी ५ मे २०१८ रोजी अलिबागजवळील कावीर येथे आत्महत्या केली. या आत्महत्येप्रकरणी ‘रिपब्लिक टीव्ही’चे अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरुद्ध अलिबाग पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला. अर्णब व अन्य दोघांनी नाईक यांचे पैसे थकवल्याने ते निराश झाले होते. धक्कादायक बाब म्हणजे याचवेळी नाईक यांच्या ७३ वर्षांच्या आई कुमुद यांचाही मृतदेह घरात सापडला होता. या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना मागील महिन्यात अटकही करण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्यांना जामीन देण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2020 9:59 pm

Web Title: chargesheet filed against arnab goswami in 2018 anvay naik suicide case scj 81
Next Stories
1 ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’च्या मोबदल्यापासून ७० हजार ‘आशा’ अद्यापि वंचित!
2 मुंबई महानगरपालिकेवरही भाजपचाच भगवा फडकणार याचा विश्वास : राम कदम
3 Video : मुंबईच्या टाउन स्क्वेअरचा इतिहास माहित्येय?
Just Now!
X