25 February 2021

News Flash

Mumbai plane crash: विमानाला नव्हते मिळाले एअरवर्दीनेस प्रमाणपत्र

घाटकोपरमध्ये गुरुवारी दुपारी दुर्घटनाग्रस्त झालेल्या चार्टर्ड विमानाला एअरवर्दीनेस प्रमाणपत्र मिळाल नसल्याची माहिती समोर आली आहे. यू वाय अॅव्हिएशन कंपनीच्या मालकीचे हे विमान होते.

Mumbai plane crash: चाचणीसाठी निघालेले विमान गुरुवारी दुपारी घाटकोपरमधील माणिकलाल परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या आवारात कोसळले.

घाटकोपरमध्ये गुरुवारी दुपारी दुर्घटनाग्रस्त झालेल्या चार्टर्ड विमानाला एअरवर्दीनेस प्रमाणपत्र मिळाल नसल्याची माहिती समोर आली आहे. यू वाय अॅव्हिएशन कंपनीच्या मालकीचे हे विमान होते. कंपनीचे मॅनेजर अनिल चौहान यांनी ही माहिती दिली. विमानाच्या उड्डाणासाठी एअरवर्दीनेस प्रमाणपत्र आवश्यक असते.

घाटकोपरच्या माणिकलाल परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या मोकळया जागेत गुरुवारी दुपारी हे चार्टर्ड विमान कोसळले. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. २६ वर्ष या जुन्या विमानाने चाचणीसाठी उड्डाण केले होते. जुहू विमानतळावर हे विमान उतरणार होते. मात्र त्याआधीच तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान घाटकोपरच्या माणिकलाल परिसरात कोसळले.

घाटकोपर हा गजबजलेला भाग असून हे विमान कुठल्या इमारतीवर कोसळले असते तर मोठी जीवितहानी झाली असती. मात्र विमानाच्या महिला पायलट मारिया यांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला. त्यांनी स्वतःचा जीव गमावला मात्र, अनेकांचे प्राण वाचवले.

वैमानिकांना होता दांडगा अनुभव

यू वाय अॅव्हिएशन कंपनीचे किंग एअर सी ९० एअरक्राफ्ट VT-UPZ हे विमान चालवणाऱ्या वैमानिकांना उड्डाणाचा दांडगा अनुभव होता. वैमानिक आणि सहवैमानिकाला विमान उड्डाणाचा दांडगा अनुभव होता. मुख्य वैमानिकाला पाच हजार तासांचा उड्डाणाचा अनुभव होता, असे कंपनीने म्हटले आहे.

या दुर्घटनेच वैमानिक मारिया झुबेर, सहवैमानिक प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी आणि मनीष पांडे या चौघांचा मृत्यू झाला तर गोविंद पंडित या पादचाऱ्याचाही अपघातात मृत्यू झाला. सहवैमानिक हा पूर्वी जेट एअरवेजमध्ये कामाला होता. तर इंजिनीअर आणि टेक्निशियन हे दोघेही इंडामेर या कंपनीचे कर्मचारी होते.

मृतांना योग्य मोबदला देणार – मुख्यमंत्री
घाटकोपर विमान अपघातातील मृतांना योग्य तो मोबदला दिला जाईल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. विमान अपघाताची घटना बांधकाम सुरु असलेल्या मोकळ्या जागेत घडल्याने सुदैवाने यात मालमत्तेचे मोठे नुकसान आणि जीवितहानी झाली नाही. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांशी मी स्वतः संपर्क साधला असून नागरी भागात विमान कोसळणे ही मोठी घटना असल्याने यामागचे कारण, चूक सर्वांसमोर यायला हवी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 9:00 am

Web Title: charted palne crash at ghatkopar not have airworthiness certificate
Next Stories
1 नाणार प्रकल्प म्हणजे कोकणी बांधवांना गॅस चेंबरमध्ये मारण्याचा कट – उद्धव ठाकरे
2 कोल्हापूर डीसीसी बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ‘अच्छे दिन’, पेन्शनमध्ये चौपट वाढ
3 Vidhan Parishad Election: नाशिक शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेच्या दराडेंचा दणदणीत विजय
Just Now!
X