21 September 2019

News Flash

मालवणी विषारी दारूप्रकरणी चौदा जणांवर आरोपपत्र

यात तीन महिलांचाही समावेश आहे. हे आरोपपत्र १३ हजार ७६० पानांचे असून ५७७ साक्षीदारांचा समावेश आहे.

 

’ १३ हजार ७६० पानांचे आरोपपत्र
’ ५७७ साक्षीदारांचा समावेश
मालाड येथील मालवणी परिसरात घडलेल्या विषारी दारूप्रकरणी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर चौदा आरोपींवर आरोपपत्र सादर केले. यात तीन महिलांचाही समावेश आहे. हे आरोपपत्र १३ हजार ७६० पानांचे असून ५७७ साक्षीदारांचा समावेश आहे. तपास अधिकारी चिमाजी आढाव यांनी हे आरोपपत्र सादर केले.
जून महिन्यात विषारी दारू पिऊन १०६ लोकांचा मृत्यू झाला होता. यानंतर मालवणी पोलीस ठाण्याच्या पाच पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्काच्या चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते.
आरोपपत्र सादर होत असताना पोलीस बंदोबस्तात चौदाही आरोपींना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. या वेळी त्या प्रत्येकाला आरोपपत्राची प्रतही देण्यात आली. याप्रकरणी दोन आरोपींना फरार दाखविण्यात आले असून त्यांची नावे संजय व नटूलाल पटेल अशी असल्याचे साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील देशमुख यांनी सांगितले. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी भायखळा आणि ऑर्थर रस्ता कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. अटक करण्यात आलेल्या तीन महिला आरोपींनी मालवणी परिसरात विषारी दारूची विक्री केली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

First Published on September 11, 2015 6:48 am

Web Title: cheap liquor case 14 peoples arrested
टॅग Liquor