News Flash

प्राणवायू खाटेच्या शोधात असलेल्यांची फसवणूक

‘स्वाभिमान’चा पदाधिकारी असल्याचा दावा करणाऱ्यास अटक

(संग्रहित छायाचित्र)

बड्या खासगी रुग्णालयात प्राणवायू, व्हेंटिलेटर खाट उपलब्ध करून देतो, अशी बतावणी करून करोना रुग्णांच्या कुटुंबीयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी  समशू उस्मानी या तरुणास वांद्रे पोलिसांनी सोमवारी रात्री अटक के ली. करोना संसर्गाने प्रकृ ती नाजूक बनलेल्या महिलेस आरोपीमुळे उपचार मिळण्यास विलंब झाला. त्यात या महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही नोंदवला आहे.

उस्मानी याने समाजमाध्यमांवर स्वाभिमान संघटनेचा वैद्यकीय सहायक, समन्वयक असल्याचे नमूद केले असून लीलावती, हिंदुजासह अन्य रुग्णालयांबाहेर उभे राहून त्याने काही ध्वनिचित्रफिती तयार के ल्या आहेत. पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी उस्मानीच्या अटके च्या वृत्तास दुजोरा दिला. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट के ले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताडदेव येथे वास्तव्यास असलेल्या अंजनामा शेट्टी (५०) यांना १४ एप्रिल रोजी वरळी येथील एनएससीआय कोविड केंद्रात दाखल करण्यात आले. ऑस्ट्रेलिया येथे स्थायिक असलेली अंजनामा यांची कन्या गंगा, मुलगा, कॅनडाहून भारतात परतलेली मुलगी चित्रा, कु टुंबीय, मित्रपरिवार व्हेंटिलेटर रुग्णशय्या मिळवण्यासाठी प्रयत्न करू लागले. तेव्हा गंगा यांना समशू याचा संपर्क क्र मांक मिळाला. चित्रा यांनी समशू याची १६ एप्रिलला स्वाभिमान संघटनेच्या कार्यालयात भेट घेतली. या भेटीत समशूने लीलावती, हिंदुजा, नानावटीसह शहरातील अन्य मोठ्या रुग्णालयांमध्ये सहज खाट उपलब्ध करून देऊ शकतो. रुग्णालयाचे देयकही भरावे लागणार नाही, असे सांगितले. या मदतीच्या बदल्यात चित्रा यांच्याकडे त्याने साडेचार लाख रुपयांची मागणी के ली. चित्रा यांनी त्याला ५० हजार रुपये दिले आणि उर्वरित रक्कम काम झाल्यावर मिळेल, असे सांगितले. पुढील काही मिनिटांत त्याने संपर्क साधून नानावटी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात खाट उपलब्ध असून आईला लवकरात लवकर येथे आणा, असे कळवले. मात्र तिला अपघात विभागात दाखल केले गेले. तिथे प्राणवायू, व्हेंटिलेटरची सुविधा नव्हती. समशूने उर्वरित पैशांसाठी तगादा लावल्यावर त्याला रुग्णालयातच दोन लाख रुपये देण्यात आले. त्यानंतर रुग्णालयात व्हेंटिलेटर खाट उपलब्ध नसून अन्य ठिकाणी आईला हलवावे लागेल, अशी सूचना रुग्णालयातील डॉक्टरने के ल्याचे चित्रा यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

ही परिस्थिती उस्मानीच्या कानावर घालताच त्याने दीड लाख रुपये परत के ले. लीलावतीसह अन्य रुग्णालयांत व्यवस्था करण्याच्या नावाखाली त्याने आणखी एक दिवस शेट्टी कु टुंबाला ताटकळत ठेवले. दरम्यान, अंजनामा यांना नानावटी रुग्णालयाच्याच अतिदक्षता विभागात खाट मिळाली. प्राणवायू, व्हेंटिलेटरची सुविधाही पुरवण्यात आली. मात्र तोवर विलंब झाला होता. २० एप्रिलला त्यांचा मृत्यू झाला.

कागदपत्रे परत देण्यास नकार

अंजनामा यांच्या मृत्यूनंतर एक लाख रुपये आणि आधार कार्ड, शिधापत्रिका आदी कागदपत्रे परत मिळवण्यासाठी उस्मानी यास संपर्क साधला असता त्याने वाद घातला. ही कागदपत्रे घेण्यासाठी कु टुंबीय स्वाभिमान संघटनेच्या वांद्रे येथील कार्यालयात गेले. तेथे उपस्थित व्यक्तींनी कागदपत्रे चित्रा यांनाच परत करू, असे सांगून त्यांना परत पाठवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 1:04 am

Web Title: cheating on those looking for an oxygen bed abn 97
Next Stories
1 स्टॅनस्वामी जामिनासाठी उच्च न्यायालयात
2 ‘…तेव्हा आमच्याकडे दुर्लक्ष’
3 वैद्यकीय प्राणवायूच्या योग्य वापराकरिता नियमावली
Just Now!
X