News Flash

पालिकेचा मुंबईकरांच्या जिवाशी खेळ-शेलार

दुर्घटनेत दगावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांसाठी राज्य सरकारसह सर्वांनीच मदत केली पाहिजे.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : महापालिकेच्या निष्काळजीपणामुळेच चेंबूरची दुर्घटना घडली असून मुंबई महापालिका मुंबईकरांच्या जिवाशी खेळत आहे, असे टीकास्त्र भाजप आमदार आशीष शेलार यांनी सोडले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भांडुप, विक्रोळी व चेंबूर येथील दुर्घटनांबाबत दु:ख व्यक्त केले आहे.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, शेलार यांनी चेंबूर आणि अन्य दुर्घटना स्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. आपत्तीत सापडलेल्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. मला यात राजकारण करायचे नाही, असे सांगून शेलार म्हणाले, महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा काय करीत आहे? डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांना महापालिकेने धोक्याची पूर्वसूचना दिली होती का? सत्ताधाऱ्यांनी काही निर्णय का घेतले नाहीत? शहरातील परिस्थिती पाहता महापालिका यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.

दुर्घटनेत दगावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांसाठी राज्य सरकारसह सर्वांनीच मदत केली पाहिजे. महापालिकेने या नागरिकांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी शेलार यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2021 3:43 am

Web Title: chembur incident ashish shelar lashes out at bmc over failure in disaster management zws 70
Next Stories
1 यंत्रणांकडून आपत्तीपूर्व दक्षता आवश्यक!
2 वातावरणीय बदलांमुळे मुंबईत वादळी पाऊस
3 भांडुप जलशुद्धीकरण संकुल जलमय
Just Now!
X