11 December 2017

News Flash

छगन भुजबळ यांचा जामीन अर्ज फेटाळला

तुरूंगावासातून मुक्त होण्याची भुजबळांची आशा मावळली.

मुंबई | Updated: May 13, 2016 3:27 PM

Chhagan Bhujbal

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे सुटकेसाठीचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत(पीएमएलए) स्थापित विशेष न्यायालयाने छगन भुजबळ यांचा जामीन अर्ज शुक्रवारी फेटाळून लावला. भुजबळ काका-पुतणे सध्या न्यायालयीन कोठडीत असून छगन भुजबळ यांनी जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने भुजबळ यांना जामीन देणे शक्य नसल्याचे सांगत याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे तुरूंगावासातून मुक्त होण्याची भुजबळांच्या आशा मावळल्या आहेत.

First Published on May 13, 2016 3:20 pm

Web Title: chhagan bhujbal bail application rejected by pmla court