24 October 2020

News Flash

अखेर छगन भुजबळांच्या सभेचा ठरला मुहूर्त

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या सभेचा मुहूर्त ठरला असून पुढच्या महिन्यात १० जूनला भुजबळ पुण्यामध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या सभेचा मुहूर्त ठरला असून पुढच्या महिन्यात १० जूनला भुजबळ पुण्यामध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या राज्यामध्ये हल्लाबोल यात्रा सुरु असून १० जूनला पुण्यामध्ये भुजबळांच्या सभेने या यात्रेचा समारोप होणार आहे. दोन वर्ष तुरुंगात काढणारे छगन भुजबळ काय बोलणार ? भाजपावर कशा पद्धतीची टीका करणार याबद्दल प्रचंड उत्सुक्ता आहे.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे पण भुजबळ सध्या परेलच्या केईएम रुग्णालयात असल्याने त्यांच्या जामिनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. वैद्यकीय अहवाल मिळाल्यानंतरच त्यांना केईएम रुग्णालयातून सोडण्यात येणार आहे. गेल्यावर्षी याच काळामध्ये जामिनासाठी धडपड करत असताना खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेता यावेत यासाठी प्रयत्नशील असणारे भुजबळ आता जामीन मिळाल्यानंतरही सरकारी रुग्णालयामध्ये उपचारासाठी का थांबले आहेत, अशी चर्चा सध्या होत आहे.

छगन भुजबळ यांना पोटदुखीचा त्रास होत असल्याने साधारण महिनाभरापूर्वी जे.जे. रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पंधरा दिवसांनी उदरविकारासंबंधीचे डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण देत त्यांना केईएम रुग्णालयामध्ये दाखल केले. त्यांच्या स्वादुपिंडाला संसर्ग झाल्याचे चाचण्यांमधून निष्पन्न झाल्यानंतर मागील पंधरा दिवसांपासून त्यांच्यावर केईएममध्ये उपचार सुरू आहेत.

ॉभुजबळ यांच्या नुकत्याच काही चाचण्या करण्यात आल्या आहेत. याचा वैद्यकीय अहवाल पुढील दोन दिवसांमध्ये प्राप्त होतील. त्यानंतरच म्हणजे साधारण तीन दिवसांमध्ये त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येईल, असे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2018 1:21 pm

Web Title: chhagan bhujbal meeting in pune
टॅग Chhagan Bhujbal,Ncp
Next Stories
1 पुणे : लग्नानंतर अनैसर्गिक शरीर संबंधास नकार दिल्याने तरुणावर चाकूने वार
2 अखेर दरवाजा तोडून शरद पवारांना काढावं लागलं बाहेर
3 मुजोर पीएमपी, उद्दाम पोलीस!
Just Now!
X