06 August 2020

News Flash

पक्ष बदलाच्या प्रश्नावर छगन भुजबळ म्हणाले…..

कठिण काळात पक्षाने साथ न दिल्यामुळे छगन भुजबळ यांच्या मनात एक नाराजीची भावना असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असतात. यासंबंधी बुधवारी एका कार्यक्रमात त्यांना थेट प्रश्न

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ जामिनावर सुटून बाहेर आल्यापासून ते पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. कठिण काळात पक्षाने साथ न दिल्यामुळे त्यांच्या मनात एक नाराजीची भावना असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असतात. यासंबंधी बुधवारी एका कार्यक्रमात त्यांना थेट प्रश्न विचारण्यात आला.

ओबीसी चेहरा असल्यामुळे तुम्हाला अन्य पक्षांकडून ऑफर आहे का ? या प्रश्नावर भुजबळ म्हणाले कि, मला कोणी घ्यायला तयार आहे असे वाटत नाही. त्यावर शिवसेना, मनसे या पक्षांनी तुमच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली हा मुद्दा उपस्थित झाला. त्यावर भुजबळ म्हणाले कि, ठाकरे कुटुंबाबरोबर सलोख्याचे कौटुंबिक संबंध आहेत. त्याचा अर्थ पक्ष सोडतो असा होत नाही.

बाळासाहेब ठाकरे एक दिलदार नेते होते. इतकी वर्ष शिवसेनेत काढल्यानंतर ओबीसीच्या प्रश्नावर शिवसेना सोडली असे त्यांनी सांगितले. पक्ष बदलाच्या प्रश्नावर त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडणार नसल्याचे स्पष्ट केले.

कसा होता भुजबळांचा तुरुंगातील अनुभव
तुरुंगात असताना वेळ घालवण्यासाठी वाचनाचा एक पर्याय होता. तुरुंगात वेगवेगळया विषयांवरील पुस्तके, वर्तमानपत्रे वाचायचो. आयुष्यात केलं नाही इतक वाचन मी तुरुंगात असताना केलं असे जामिनावर बाहेर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितले. एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात ते बोलत होते. रोज वेगवेगळी वर्तमानपत्रे वाचत असल्यामुळे बाहेर काय चाललयं ते वर्तमानपत्रांमधून समजत होते.

दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असलेल्या पद्मावत चित्रपटाचा संपूर्ण वाद वर्तमानपत्रांमुळे समजला असे छगन भुजबळ यांनी सांगितले. जेलमध्ये फक्त दूरदर्शन पाहायला मिळायचे. डीडीचे एकच चॅनल लागायचे. तुरुंगातल्या बराकीतून समोरच्या टीव्हीवर जे लागलेले असायचे ते पाहत बसायचो. एकही नवीन सिनेमा पाहता आला नाही पण काही जुने सिनेमे पाहता आले असे तुरुंगातील अनुभव सांगताना भुजबळ म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2018 7:00 pm

Web Title: chhagan bhujbal ncp maharashtra sadan scam jail experiance
टॅग Chhagan Bhujbal,Ncp
Next Stories
1 कोरेगाव-भीमा हिंसाचार: राहुल फटांगडे हत्येप्रकरणी टेंभुर्णीतून एकजण ताब्यात
2 जेलमध्ये गजाआडून डीडीचे कार्यक्रम बघायचो – छगन भुजबळ
3 अटक होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं – छगन भुजबळ
Just Now!
X