कोटय़वधी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या वैद्यकीय कागदपत्रांत फेरफार केल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी डॉक्टर राहुल घुले यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याचे समजते. खोटय़ा दंत उपचारासाठी नियोजित भेट घेण्यात आली होती. मात्र भुजबळ रुग्णालयात येताच कागदपत्रांत फेरफार करून त्यांच्या छातीत दुखत असल्याचे कारण
पुढे करण्यात आले. याबाबत तुरुंग महानिरीक्षक राजेंद्र दामणे चौकशी करणार असून सोमवारी गृहखात्याकडे अहवाल सादर करणार असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी तुरुंग प्रशासनाने दुजोरा दिला आहे. यावर डॉक्टर राहुल घुले यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.