News Flash

‘जितके अत्याचार, लढा तितकाच प्रखर’

सुधारित नागरिकत्त्व कायद्याविरोधात छात्र भारतीची परिषद

 

सुधारीत नागरिकत्त्व कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा देशात धार्मिक फाळणी करू इच्छितात. ती रोखण्यासाठी धर्म, जात, लिंग असा कोणताही भेदभाव न करता एकत्र येऊन लढा दिला जाईल. देशातील विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलने सुरू केली आहेत. बेछूट गोळीबार, देशद्रोही असल्याचा आरोप करून धरपकड करून ते दडपण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मात्र जितके अत्याचार होतील, लढा तितकाच प्रखर असेल, अशी भूमिका रविवारी विविध विद्यार्थी नेत्यांनी मांडली.

येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे रविवारी छात्र भारती संघटनेने आयोजित केलेल्या छात्र परिषदेत विद्यार्थी नेते उमर खालीद, सलमान इम्तियाज, प्रदीप नरवाल, रामा नागा, हम्मादुर रेहमान, सादिया शेख, भट्टा राम,  शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड, आमदार कपिल पाटील आदींनी भूमिका मांडली.

२४ जानेवारीला मुंबईत मोठा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही निमंत्रित केले जाईल, असे छात्रभारतीच्या वतीने पाटील यांनी सांगितले. तर ही चळवळ जाती, धर्मापलीकडे जाऊन घराघरांत पोहोचायला हवी. महाराष्ट्रात हे लागू होणार नाही, यासाठी पूर्णपणे प्रयत्न करेन, असे आश्वासन वर्षां गायकवाड यांनी दिले.

देशात पुन्हा फाळणी घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप उमर खालीद यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2020 1:01 am

Web Title: chhatra bharati parishad against revised citizenship law abn 97
Next Stories
1 पार्ले टिळक शाळेत ‘भाषाविश्व’ प्रदर्शन
2 मुंबईच्या तापमानात वाढ
3 १२ कोटींचे अमली पदार्थ हस्तगत
Just Now!
X