20 September 2020

News Flash

कोंबडी, अंडी आहार सुरक्षित

समाजमाध्यमांवरील अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

समाजमाध्यमांवरील अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

मुंबई : कुक्कु ट पक्षी व कु क्कु ट उत्पादने अर्थात कोंबडीचे मांस व अंडी यांचा ‘नोव्हल करोना विषाणू’ प्रार्दुभावाशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे शिजवलेले कोंबडीचे मांस किंवा अंडी यापासून करोनाचा धोका नसल्यामुळे मानवीय आहारामध्ये ते वापरण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने दिला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून कोंबडी व अंडी खाण्याबाबत समाजमाध्यमातून वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात होत्या. मात्र कुक्कुट उत्पादने खाण्यासाठी सुरक्षित असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या पुणे येथील पश्चिम विभागीय रोगनिदान प्रयोगशाळा व रोग अन्वेषण विभाग यांनी जारी केलेल्या परिपत्रकान्वये जाहीर करण्यात आले आहे. समाज माध्यमांवर कुक्कुट उत्पादनांबाबत फिरत असलेल्या अफवांकडे नागरिकांनी दुर्लक्ष करावे व याबाबत काही शंका असल्यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क करावा, असेही आवाहन या विभागाने केले आहे.

महाराष्ट्र  राज्य कुक्कुटपालन व्यवसायामध्ये देशात अग्रेसर आहे. सन २०१९ च्या  पशुगणनेनुसार राज्यामध्ये एकूण कुक्कुट संख्या सुमारे ७ कोटी ४२ लाख इतकी आहे. राज्यातील कुक्कुट पालन व्यवसायावर लाखो शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होत असतो. मका व सोयाबीन उत्पादक शेतकरी विशेषत: कुक्कुट पालन उद्योगाशी संलग्न आहेत. तसेच कुक्कुट व्यवसाय राज्याच्या विकासाशी जोडलेला आहे. कुक्कुट मांस व कुक्कुट उत्पादने यांच्या सेवनामुळे मानवामध्ये  ‘नोव्हेल करोना विषाणू’ संक्रमित झाल्याचे संदर्भ नाहीत. आपल्याकडे चिकन व मटन उकळून शिजवून सेवन केले जाते व त्या तापमानात कुठलेही विषाणू जिवंत राहु शकत नाहीत.

कुक्कुट पक्ष्यामधील करोना विषाणू (इन्फेक्शीअस ब्रॉंकायटीस) मानवामध्ये संक्रमित होत नसल्याबाबत शास्त्रीय संदर्भ आहेत. तरी ग्राहकांनी समाज माध्यमांद्वारे (सोशल मिडीया) प्रसारित  करण्यात येणाऱ्या चुकीच्या माहितीवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, अशीही माहिती महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाद्वारे देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 2:27 am

Web Title: chicken egg safe diet during corona period zws 70
Next Stories
1 मुंबईत अतिदक्षता खाटांची कमतरता
2 चित्रपटगृहांसाठी मनोरंजनविश्वाची एकजूट
3 घटस्फोटाविरोधातील अपील प्रलंबित असताना दुसरा विवाह
Just Now!
X