21 November 2019

News Flash

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बदली

अश्वनी कुमार यांच्या जागी बलदेव सिंग

(संग्रहित छायाचित्र)

अश्वनी कुमार यांच्या जागी बलदेव सिंग

मुंबई : विधानसभा निवडणूक तोंडावर असताना राज्य सरकारने मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांची उचलबांगडी करत त्यांच्या जागेवर बलदेव सिंग यांची नियुक्ती केली आहे.लोकसभा निवडणुकीच्या काळात आपल्या कार्यशैलीमुळे अश्वनी कुमार यांच्याबाबत त्यांच्या कार्यालयात नाराजी पसरल्याचे वृत्त होते. आता विधानसभा निवडणूक तीन महिन्यांवर आली आहे. निवडणूक यंत्रणा राबवण्याबरोबरच आचारसंहिता भंगाच्या तक्रारींवर अहवाल मागवणे आदी महत्त्वाची कामे या कार्यालयाकडे असतात. या पाश्र्वभूमीवर अश्वनी कुमार यांच्या जागेवर बलदेव सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बलदेव सिंग हे १९८९च्या तुकडीचे सनदी अधिकारी आहेत.

First Published on July 12, 2019 1:01 am

Web Title: chief election officer ashwani kumar transfer zws 70
Just Now!
X