लोकायुक्तांच्या चौकशीच्या कार्यकक्षेत मुख्यमंत्र्यांना आणण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय म्हणजे जनतेच्या डोळ्यात केलेली निव्वळ धूळफेक आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी  केली. मुख्यमंत्रिपदावर असताना त्यांची चौकशी होणार नाही, तर पदावरून पायउतार झाल्यावर होणार आहे, असे त्यांनी सांगितले. हिम्मत असेल तर केंद्राच्या धर्तीवर राज्यातही लोकायुक्त कायदा करावा, असे आव्हान त्यांनी राज्य सरकारला दिले.

मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकायुक्त कायद्यात दुरुस्ती करून त्यांच्या चौकशीच्या कार्यकक्षेत मुख्यमंत्र्यांना आणण्याचा निर्णय घेण्यात आला. नवाब मलिक यांना या निर्णयावर शंका उपस्थित केली आहे.