News Flash

कोस्टल रोडसाठी ‘मावळा’ खोदणार बोगदा; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नव्या यंत्राचे उद्घाटन

कोस्टल रोडच्या महत्वाच्या टप्प्याचे काम सुरु

मुंबई : कोस्टल रोडसाठी बोगदा खोदणाऱ्या 'मावळा' मशिनचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या कोस्टल रोडच्या कामामधील एका महत्वाच्या टप्प्याच्या कामाला आज सुरुवात झाली. कोस्टल रोडच्या बोगद्याचे खोदकाम करणाऱ्या अजस्त्र बोरिंग मशिनचा शुभारंभ आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रियदर्शिनी पार्क येथे करण्यात आला. या मशिनचे ‘मावळा’ असे वैशिष्ट्यपूर्ण नाव ठेवण्यात आले आहे. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे , मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल उपस्थित होते.

या मावळाच्या उद्घाटप्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “मुंबईमध्ये दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत चाललेली आहे. उपनगरांतून शहरील दोन टोकांना सांधणारा ‘कोस्टल रोड’ हा महामार्ग आहे. हा कोस्टल रोड झाल्यानंतर शहरांमध्ये येणाऱ्या वाहतुकीला थोडासा दिलासा मिळेल. ज्यांना मध्य शहरात जाण्याची आवश्यकता आहे त्यांना थेट शहरात येण्याची सोय यामुळे होणार आहे. हा जो सागरी महामार्ग आहे त्यातील हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे त्याची सुरुवात आज झालेली आहे.”

मुंबईच्या दृष्टीने आजचा हा समाधान देणारा आणि महत्त्वाचा क्षण आहे. २०१२ पूर्वीच आपण या समुद्री मार्गाची संकल्पना माडंली होती. वांद्रे-वरळी सी-लिंकलाच पुढे जोडणारा हा मार्ग असेल, अशी संकल्पना होती. मुंबईला सुंदर असा समुद्र किनारा लाभला आहे. समुद्राच्या या क्षितीजावर समुद्री मार्गही शोभून दिसणारा आहे. यासाठी आपण अप्रतिम असे नियोजन केले होते. कामही धुमधडाक्यात सुरु केले होते. मध्येच कोरोनाचे संकट आले, अजूनही ते गेलेले नाही. तरीही अनेक गोष्टी ठप्प झाल्या असतानाही, या कोस्टल रोडचे काम मंदावू दिलेले नाही. कोणतेही काम पुढे नेताना केवळ नेता असून भागत नाही, त्यासाठी लढवय्या मावळ्यांची गरज असते. तसे या कामामध्ये ‘मावळा’ या यंत्राचे काम असेल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

उपनगरातील जनतेला थेट शहरात अधे-मधे न थांबता यायचे झाल्यास आता हा समुद्री मार्ग उपयुक्त ठरणार आहे. त्यांचा प्रवासही नयनरम्य होणार आहे. मुळात या समुद्री मार्गात भुयारी मार्गाच मोठ्या लांबीचा आहे. त्या कामाची आपण आज सुरवात करणार केली. हा भुयारी मार्ग थेट मलबार हिल खालून, गिरगाव चौपाटीवर निघणार आहे. हे काम लवकरावत लवकर म्हणजे नियोजित वेळेच्या आधीच पूर्ण होईल, असा विश्वास आहे. उपनगरांतून येणाऱ्या मुंबईकरांसाठी तो लवकरात लवकर वापरात येईल, अशी आशा आहे.

मावळा मशीन नेमके काय आहे?

बोगदा खणणारं मावळा मशीन (टीबीएमचा) हे या प्रकल्पातील महत्त्वाचं साधन आहे. या मशीन १२.१९ मीटर व्यासची आहे. हे भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठ्या व्यासाचा टीबीएम मशीन आहे. बोगद्याचा तयार केलेला व्यास ११ मीटर बोगद्यात सर्व सुरक्षेची व्यवस्था असेल. या टीबीएम मशीनला मावळा असं नाव देण्यात आलं आहे. अरबी समुद्राखालील तब्बल १७५ एकर जमिनीवर भराव टाकण्यात आला आहे. तर अजून १०२ एकर समुद्राखालील जमिनीवर भराव टाकण्यात येणार आहे. इतकंच नाही तर या मार्गावर समुद्राखालून ४०० मीटरचे बोगदे असतील. हे बोगदे खोदण्यासाठी मावळा हे मशीन आणलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2021 2:23 pm

Web Title: chief minister inaugurates mawla machine digging tunnel for coastal road aau 85
Next Stories
1 मुंबई विमानतळावर ‘आरोग्य सेतू’ची सक्ती; स्व-घोषणापत्रांचा विसर
2 सत्ताबदलानंतर सुरक्षा कपातीची परंपराच
3 मराठी सक्तीचा आग्रह थंडावला
Just Now!
X