लहान मुलांमधील करोना कसा रोखावा

मुंबई: लहान मुलांना होणारा करोनाचा संभाव्य धोका रोखण्यासाठी राज्यातील बालरोगतज्ज्ञांना सहभागी करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. गेल्या दोन आठवड्यांमध्ये त्यांनी मुंबईसह राज्यातील डॉक्टर्सशी संवाद साधला आहे. त्याप्रमाणे आज, रविवारी २३ दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री राज्यातील बालरोगतज्ज्ञांशी संवाद साधणार आहेत.

करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली असून या लाटेत लहान मुलांना जास्त धोका संभवण्याची शक्यता आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्यात बालरोगतज्ज्ञांचा कृती गट स्थापन करण्यात आला आहे. डॉ. सुहास प्रभू हे या कृती गटाचे अध्यक्ष असून डॉ. विजय येवले, डॉ. परमानंद आंदणकर हे सदस्य आहेत. एखाद्या मुलाला करोनाची लागण झाल्यास त्याच्यावर कसा उपचार करावा, तसेच त्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत कृती गटाचे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

हा कार्यक्रम रविवारी दुपारी १२ पासून मुख्यमंत्र्यांच्या Facebook  https://www.facebook.com/CMOMaharashtra   आणि Youtube- https://www.youtube.com/channel/UCjCKXSvaxqkuuwrozExDuhQ    येथे थेट पाहता येणार आहे.

या कार्यक्रमात राज्यातील अधिकाधिक बालरोगतज्ज्ञांनी ऑनलाइन लिंकद्वारे सहभागी व्हावे, असे आवाहन बालरोगतज्ज्ञ संघटनेचे महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. जयंत पांढरीकर यांनी केले आहे.