शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : केंद्र सरकारचा नवीन भाडेकरू कायदा महाराष्ट्रात लागू करू नये, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बुधवारी वर्षा शासकीय निवासस्थानी देण्यात आले.

केंद्र सरकारच्या प्रस्तावित नवीन भाडेकरू कायद्यास विरोध करून शिवसेनेने भाडेकरूंची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न सुरू के ला आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या विरोधात हवा तापविण्यासाठी शिवसेनेच्या वतीने या प्रस्ताविकत कायद्याला विरोध करण्यात येत आहे. केंद्रातील भाजप सरकारकडून घर मालकांच्या बाजूने निर्णय घेतला जात असल्याची टीका शिवसेनेकडून सातत्याने करण्यात येत आहे. दक्षिण व मध्य मुंबईत शिवसेनेने केंद्राच्या कायद्याच्या विरोधात जनजागृती करण्यावर भर दिला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपच्या विरोधात हा मुद्दा तापविण्याची शिवसेनेची योजना आहे. मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील प्रभू, सदा सरवणकर आदींचा समावेश होता.