मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. रोहिणी गोडबोले यांचं फ्रान्स सरकारकडून वैज्ञानिक क्षेत्रातील योगदानाबद्दल देण्यात येणारा ‘ऑड्रे नेशन डू मेरिट’ पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे.
मुख्यमंत्री अभिनंदन संदेशात म्हणतात
महाराष्ट्र सुपुत्री ज्येष्ठ पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. रोहिणी गोडबोले यांचे फ्रान्स सरकारकडून वैज्ञानिक क्षेत्रातील योगदानाबद्दल देण्यात येणारा मानाचा ”ऑड्रे नेशन डू मेरिट” पुरस्कार मिळाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. या पुरस्काराने महाराष्ट्र आणि देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. डॉ. गोडबोले यांच्या वैज्ञानिक संशोधन कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान आहे. पदार्थविज्ञान क्षेत्रातील महत्वपूर्ण संशोधन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीसाठी काम करणाऱ्या पद्मश्री डॉ. रोहिणी गोडबोले यांचे अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 14, 2021 7:06 pm