News Flash

‘आर्थिक सर्वेक्षणा’ची ‘आधार’शी सांगड घाला

मुख्य सचिवांचे प्रतिपादन

मुख्य सचिवांचे प्रतिपादन

शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘आधार’ आणि केंद्र शासनाचे सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण यांची सांगड घालणे आवश्यक असल्याचे आग्रही प्रतिपादन राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे नीती आयोगाच्या राष्ट्रीय परिषदेत केले.

विज्ञान भवन येथे नीती (नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर ट्रान्स्फॉìमग इंडिया) आयोगाच्या वतीने सर्व राज्यांचे तसेच केंद्र शासित प्रदेशांचे मुख्य सचिव तथा नियोजन सचिवांची राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत क्षत्रिय बोलत होते. केंद्र शासनाच्या आधार योजनेमुळे कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर होण्यास मदत होत आहे. केंद्र शासन दरवर्षी सामाजिक आíथक सर्वेक्षण करते. कोणतीही योजना राबविण्यासाठी परिपूर्ण माहितीची आवश्यकता असते, यासाठी केंद्र शासनाच्या सामाजिक व आíथक सर्वेक्षणातून समोर आलेली माहिती व ‘आधार’ यामधील माहिती याची एकत्र सांगड घालण्याची आवश्यकता आहे. यामुळे शासकीय योजनांचा लाभ हा शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात मदत होणार होईल, अशी मागणी क्षत्रिय यांनी या वेळी केली. जलयुक्त शिवारसारख्या योजनेच्या माध्यमातून राज्यात ११ हजार ४०० गावांमध्ये जलसंधारणाची कामे सुरू आहेत. गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रात टंचाईची परिस्थिती आहे. मात्र गेल्या दीड वर्षांत झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामांचा दृश्यपरिणाम या पावसाळ्यात दिसत आहे.

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी ही योजना राज्याला वरदान ठरत आहे, असेही क्षत्रिय यांनी या वेळी सांगितले. दर सहा महिन्यांनी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करून त्यामध्ये विविध राज्यांनी राबविलेल्या यशस्वी योजनांचे आदान-प्रदान झाले पाहिजे. यशोकथांद्वारे विविध राज्यांत सुरू असलेले अभिनव उपक्रम अन्य राज्यांनादेखील उपयुक्त ठरू शकतील अशी सूचनाही त्यांनी या वेळी केली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 12:30 am

Web Title: chief secretary comment on economic survey
Next Stories
1 सार्वजनिक प्रसाधनगृहांमधील दरवाढीला आयुक्तांची स्थगिती
2 अनधिकृत बांधकामाचे दोनदा पाडकाम
3 काळ्या यादीतील कंत्राटदारांचा कल्याण-डोंबिवलीत सुकाळ!
Just Now!
X